बीएमसी निवडणुकीत उमेदवारांना 8 रुपयांची चहा लागणार गोड
By Admin | Updated: January 18, 2017 00:34 IST2017-01-18T00:34:32+5:302017-01-18T00:34:32+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील उमेदवारांना आता कॉफी आणि चहाच्या खर्चावर निवडणूक आयोगाने मर्यादा घातली आहे.

बीएमसी निवडणुकीत उमेदवारांना 8 रुपयांची चहा लागणार गोड
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील उमेदवारांना आता कॉफी आणि चहाच्या खर्चावर निवडणूक आयोगाने मर्यादा घातली आहे.
गेल्या 2011मध्ये झालेल्या निवडणुकीत उमेदवारांकडून करण्यात आलेल्या खर्चाचा अहवाल लक्षात घेऊन आगामी निवडणुकीवर राज्य निवडणूक आयोगाने करडी नजर ठेवली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांना कॉफी आणि चहाच्या खर्च फक्त 8 रुपये दाखवता येणार आहे. एक कप चहा आणि कॉफीची किंमत जवळपास 20 ते 30 रुपये इतकी आहे.
उमेदवारांनी किती खर्च करावा यासंदर्भातील तक्ता 30 जुलै 2011 पासून अद्ययावत करण्यात आला नाही. गेल्या महापालिकेची निवडणूक 16 फेब्रुवारी 2012ला घेण्यात आली होती. फर्स्ट पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, कॉफी आणि चहासाठी 8 रुपये, लाईट स्नॅक 15 रुपये, लंच/डिनर 70 रुपये आणि मतदान एजेन्टला 100 रुपयांऐवजी 50 रुपये करण्यात आले आहेत. मात्र आता या खर्चावर निवडणूक आयोगानं मर्यादा घातली आहे.