उमेदवारांचे साईबाबांना साकडे

By Admin | Updated: May 16, 2014 03:21 IST2014-05-16T03:21:57+5:302014-05-16T03:21:57+5:30

लोकसभेच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना अनेक उमेदवारांनी गुरुवारी साईदरबारी हजेरी लावत यशासाठी बाबांना साकडे घातले़

Candidates should meet Saibaba | उमेदवारांचे साईबाबांना साकडे

उमेदवारांचे साईबाबांना साकडे

शिर्डी (जि़ अहदमनगर) : लोकसभेच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना अनेक उमेदवारांनी गुरुवारी साईदरबारी हजेरी लावत यशासाठी बाबांना साकडे घातले़ गुरुवारचा मुहूर्त साधत सकाळी दहाच्या सुमारास भाजपाच्या पूनम महाजन व त्यानंतर काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी सार्इंना यशासाठी आशीर्वाद मागितले, तर दुपारी एकच्या सुमारास राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेलही साई समाधीवर नतमस्तक झाले़ याशिवाय गोपीनाथ मुंडे, माजी पंतप्रधान देवेगौडा व जयललिता यांच्या पुत्रानेही या आठवड्यात साईदरबारी हजेरी लावली़ पूनम महाजन यांनी माध्यमांशी बोलायचे टाळले, तर साईदर्शनानंतर काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनी एक्झिट पोल काहीही असले तरी यूपीए सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला़ (वार्ताहर)

Web Title: Candidates should meet Saibaba