उमेदवार मुलाखती; राष्ट्रवादीत गोंधळ

By Admin | Updated: January 16, 2017 04:04 IST2017-01-16T04:04:53+5:302017-01-16T04:04:53+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोवा मेळाव्यात ४८ इच्छुक उमेदवाराची नावे घोषित केली.

Candidates interviews; Confusion in the NCP | उमेदवार मुलाखती; राष्ट्रवादीत गोंधळ

उमेदवार मुलाखती; राष्ट्रवादीत गोंधळ


उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोवा मेळाव्यात ४८ इच्छुक उमेदवाराची नावे घोषित केली. संजीव नाईक, आमदार ज्योती कलानी यांच्या उपस्थितीत १८ कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केल्याची माहिती पक्षाचे निरीक्षक सुधाकर वढे यांनी दिली, तर पक्षाच्या इच्छुुक उमेदवाराच्या मुलाखती १८ जानेवारीला घेणार असल्याचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले. त्यामुळे उमेदवारीवारून पक्षात गोंधळ असल्याचे दिसून आले.
महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ५ डिसेंबरला गोव्यात राष्ट्रवादीचा मेळावा झाला. त्याला माजी खा. संजीव नाईक यांच्यासह निरीक्षक वढे, ज्योती कलानी, विरोधी पक्षनेता ठाकूर कुमारी, गटनेता मनोज लासी, युवा नेता ओमी कलानी यांच्यासह कार्यकर्ते व इच्छुक उपस्थित होते. या वेळी संजीव नाईक यांनी ४८ उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांना काम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार या उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला आहे.
१८ जानेवारीला इच्छुकांच्या मुलाखती होतील. त्याचदिवशी इतर पक्षातील नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती प्रमोद हिंदुराव यांनी दिली. ज्योती कलानी यांनी ४६ उमेदवार प्रचाराला लागल्याचे सांगितले. तसेच या घडामोडींची माहिती पक्षाचे नेते व शहराचे प्रभारी गणेश नाईक यांना असल्याचे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Candidates interviews; Confusion in the NCP