विधान परिषदेवरील राजकीय नियुक्त्या रद्द करा
By Admin | Updated: June 20, 2014 22:02 IST2014-06-20T21:46:39+5:302014-06-20T22:02:22+5:30
- विनोद तावडेंची राष्ट्रपतींकडे मागणी

विधान परिषदेवरील राजकीय नियुक्त्या रद्द करा
- विनोद तावडेंची राष्ट्रपतींकडे मागणी
मुंबई : विधानपरिषद सदस्य म्हणून राज्यपालांनी नुकतेच नामनियुक्त केलेले सर्व १२ सदस्य काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली. घटनेच्या कलम १७१(५) नुसार राज्यपाल नियुक्त सदस्य हे कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्राशी संबंधित अथवा यात उल्लेखनीय योगदान देणारे असले पाहिजेत. परंतु जूनमध्ये ज्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली ते सर्व सदस्य राजकीय कार्यकर्ते, नेते आहेत. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या नियुक्त्या करण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)