कॅनडाच्या तज्ज्ञांचे पथक करणार लोणार सरोवराचा अभ्यास

By Admin | Updated: June 19, 2014 22:25 IST2014-06-19T20:38:57+5:302014-06-19T22:25:09+5:30

कॅनडा येथील १५ तज्ज्ञांचे पथक लोणार येथे २0 जून रोजी दाखल होणार आहे.

Canada's expert team will study the lorry | कॅनडाच्या तज्ज्ञांचे पथक करणार लोणार सरोवराचा अभ्यास

कॅनडाच्या तज्ज्ञांचे पथक करणार लोणार सरोवराचा अभ्यास

लोणार : कॅनडा व अमेरिका येथे उल्कापातामुळे निर्माण झालेल्या विवरांना पर्यटनस्थळाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या कॅनडा येथील १५ तज्ज्ञांचे पथक लोणार येथे २0 जून रोजी दाखल होणार आहे. हे पथक तब्बल दीड महिना लोणार येथे थांबून लोणार सरोवराला पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर आनण्यासाठी अभ्यास करणार आहेत.
लोणार सरोवराचा वारसा टिकवण्यासाठी व त्याला पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी लागणारे प्रयत्न कमी पडत असल्यामुळे या जागतिक कीर्तीच्या सरोवराची अवस्था बिकट झाली आहे. या खार्‍या पाण्याच्या सरोवराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाने युनोस्कोकडे पाठविल्यामुळे आता सरोवराचा विकास होईल, अशी अपेक्षा पर्यटकांना आहे. लोणार सरावराचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी शासनाच्यावतीने कॅनडा येथील क्युबेक प्रांतातील मार्टीयल येथील एस.ए.जे.ई.मोंट्रीयल या संस्थेचे सहकार्य घेण्यात आले आहे.
संस्थेचे तज्ज्ञ कन्सलटंट अँलन यांनी ५ एप्रिल रोजी पर्यटन विकास महामंडळाचे प्रधान सचिव सुमित मलीक यांच्यासोबत लोणारला भेट देऊन परिसराची पाहणी केली होती. या सरोवराला जागतिक स्तरावर पर्यटनाचा केंद्रबिंदू बनविण्याच्या दृष्टीने आखण्यात येत असलेल्या योजनेचा एक भाग म्हणून त्यांची भेट होती. त्यावेळी त्यांनी संपूर्ण माहिती घेतली होती.
राज्यातील सर्वात छोटे अभयारण्य म्हणून घोषित केलेल्या सरोवराच्या ७ कि.मी. परिसराची पाहणी करून येथे पर्यटनाच्या दृष्टीने विकासाला बराच वाव असल्याचे सांगून कॅनडा आणि भारताचा पर्यटन क्षेत्राच्या विकासाबाबत झालेल्या करारा अंतर्गत लोणार सरावराचा आणि परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी हे पथक अभ्यास करणार आहे. २0 जून रोजी हे १0 सदस्यीय पथक लोणारमध्ये दाखल होत आहे. दीड महिना अभ्यास करून हे पथक विकास आराखडा राज्य व केंद्र शासनाकडे दाखल करणार आहेत.

Web Title: Canada's expert team will study the lorry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.