मुंबईसारख्या महागड्या शहरात परवडणाऱ्या किंमतीत घर उपलब्ध झाली आहेत. कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर आणि जिल्हा, तसेच वसई (पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत ५ हजार २८५ सदनिका आणि ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीसाठी अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्जदार १३ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
कोकण मंडळाने जाहीर केलेल्या नवीन घरांच्या सोडतीचे विभाजन पाच प्रमुख घटकांमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये विविध योजनांच्या अंतर्गत एकूण ५ हजार २८५ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. खालीलप्रमाणे या योजना विभागल्या आहेत.
योजना | सदनिका/ भूखंड |
१) सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (२०%) | ५६५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध |
२) एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना (१५%) | ३ हजार २ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध |
३) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना | १ हजार ६७७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध |
४) ५० टक्के परवडणाऱ्या घरांसाठी राखीव योजना | ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध |
५) भूखंड विक्री योजना | ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध |
म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का?म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर खरेदीच्या तारखेपासून पाच वर्षांपर्यंत विक्रीवर बंदी आहे. पंरतु, घरमालक त्याचे घर कायदेशीररित्या भाड्याने देऊ शकतो. परंतु, त्यासाठी घरमालकाला म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी घ्यावी लागेल. मालकाच्या उत्पन्न श्रेणीनुसार एनओसी शुल्क २००० ते ५००० रुपयांपर्यंत असते.