शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार थांबला, सासुरवाडी झाली नि:शब्द ! जावयाच्या निधनाने तेर सुन्न, गाव बंद ठेवून शोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 10:17 IST

Ajit Pawar Death News: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धाराशिवचे नाते अतूट राहिले आहे. जिल्ह्यातील तेर ही त्यांची सासुरवाडी. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लागल्याने अजितदादा, पत्नी सुनेत्राताईंच्या भाचेसून अर्चना पाटील या तेर गटातून उमेदवार आहेत. सकाळी ८ वाजताच त्यांचे ‘डोअर टू डोअर कॅम्पेन’ सुरू होते. अवघ्या अर्ध्या तासातच त्यांना विमान दुर्घटनेचा फोन आला.

तेर / धाराशिव - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धाराशिवचे नाते अतूट राहिले आहे. जिल्ह्यातील तेर ही त्यांची सासुरवाडी. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लागल्याने अजितदादा, पत्नी सुनेत्राताईंच्या भाचेसून अर्चना पाटील या तेर गटातून उमेदवार आहेत. सकाळी ८ वाजताच त्यांचे ‘डोअर टू डोअर कॅम्पेन’ सुरू होते. अवघ्या अर्ध्या तासातच त्यांना विमान दुर्घटनेचा फोन आला. गावात सगळीकडे जावयाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली अन् अख्खे तेर शाेकसागरात बुडाले.

बारामतीचे पवार अन् तेरच्या पाटील कुटुंबाचे राजकीय ऋणानुबंध महाराष्ट्राला माहीत आहेतच. १९८५ साली अजित पवार हे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्राताई यांच्याशी लग्नबंधनात अडकले. त्यानंतर ४० वर्षे तेरशी अजितदादांचे नाते राहिले होते.

बुधवारच्या सकाळी निवडणुकीची लगबग सुरू होती. सुनेत्राताईंच्या भाचेसून अर्चना पाटील या तेर गटातून भाजपच्या उमेदवार आहेत. सकाळी ८ वाजताच त्यांनी घरोघर भेटी देत प्रचार सुरू केलेला. विठ्ठलनगर, अंजनीनगर भागात असताना त्यांना त्यांचे पती आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा फोन आला. त्याचक्षणी डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करुन देत कार्यकर्त्यांना ‘मी येते’, इतकेच दोन शब्द सांगून तेर सोडले. कार्यकर्ते काही क्षण बुचकळ्यात पडलेले. तोवर अजितदादांच्या अपघाताची बातमी गावभर पसरली. पाहता पाहता संपूर्ण सासरवाडी डॉ. पाटील यांच्या गावातील वाड्यासमोर जमली. पक्षभेद विसरून सर्वच कार्यकर्तेही एकत्र आले. त्यांनी गाव बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली.

गोष्ट एका लग्नाची तेरचे डॉ. पद्मसिंह पाटील खा. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी १९८५ साली खुद्द डॉ. पाटील यांनीच शरद पवारांकडे सुनेत्राताईंचा हात अजितदादांच्या हाती देण्यासाठी प्रस्ताव मांडला.मुलगी पाहण्याचा कार्यक्रम मुंबईतच डॉ. पाटील यांच्या बंधूंच्या घरी झाला. ३० डिसेंबर १९८५ रोजी दोघांची लग्नगाठ बांधली.

ती भेट ठरली अखेरची.. अजितदादा यांची तेरला शेवटची भेट पाच वर्षांपूर्वी झाली. त्यांचे मेहुणे अमर पाटील यांच्या निधनानंतर ते आले. त्यांचा अखेरचा दौरा नगरपरिषद निवडणुकीत झाला. नोव्हेंबरमध्ये आ. राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या विवाहाला हजर राहून नळदुर्गात त्यांनी सभा घेतल्याचे, असे डॉ. पाटलांचे सहकारी रामलिंग लामतुरे सांगतात..

English
हिंदी सारांश
Web Title : Silence in Ajit Pawar's in-laws' village after son-in-law's death.

Web Summary : Ajit Pawar's in-laws' village, Ter, mourns his death. Election campaigning halted, a wave of grief swept through the village. Pawar's long ties to Ter, strengthened by marriage, are remembered as the community mourns the loss, closing shops as a sign of respect and remembrance.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाdharashivधाराशिव