मतदान यंत्रंची कॅमेराबंद तपासणी!
By Admin | Updated: August 21, 2014 23:19 IST2014-08-21T23:19:54+5:302014-08-21T23:19:54+5:30
ठाणो, पालघर जिल्ह्यांतील 24 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची जिल्हा व तालुका पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

मतदान यंत्रंची कॅमेराबंद तपासणी!
सुरेश लोखंडे - ठाणो
विधानसभा निवडणुकीचे लवकरच पडघम वाजणार आहेत. त्याआधी ठाणो, पालघर जिल्ह्यांतील 24 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची जिल्हा व तालुका पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुख्यत: मतदानासाठी लागणा:या सुमारे 18 हजार 5क्क् मतदान यंत्रंची (ईव्हीएम मशीन) काटेकोरपणो तपासणी करून त्यांना तत्काळ सील करण्याचे काम संबंधित विधानसभा मतदारसंघांच्या कार्यालयांमध्ये युद्धपातळीवर सुरू असून त्याचे कॅमे:यामध्ये चित्रीकरणही केले जात आहे.
निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांमध्ये अद्याप अस्थिरता दिसून येत आहे. वरिष्ठ पातळीवर बैठका, चर्चा रंगत असल्या तरी स्थानिक पातळीवर मात्र अजून मतभेद आहेत. पण, जिल्हा प्रशासनाची निवडणूक शाखा, तहसीलदार व त्यांच्या नियंत्रणातील यंत्रणोद्वारे मतदारसंघ, त्यातील मतदान केंद्रांच्या नियोजनासह मतदारांची नावनोंदणी, मतदार याद्यांतील दुरुस्तीचे काम सुरू आहे. या मतदारसंघांसाठी लागणा:या साहित्याच्या खरेदीची तयारी सुरू केली आहे. याशिवाय, 18 हजार 5क्क् बॅलेट व कंट्रोल युनिटची तपासणी इन-कॅमेरा करून त्यांना जबाबदार अधिका:यांच्या समक्ष सील करण्यात येत आहे. या तयारीला कॅमेराबंद केले जात आहे. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी 15 अभियंत्यांचे पथक तैनात असून त्यांच्याद्वारे काम सुरू आहे.
सध्या जिल्ह्यात सुमारे 73 लाख मतदारांची नोंद करण्यात आली आहे. निवडणुकीर्पयत यात वाढ होण्याची शक्यता आहे. पण, लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन सुमारे आठ हजार 44 मतदान केंद्रांसाठी लागणा:या मतदार यंत्रंचे नियोजन करण्यात येत आहे. लोकसभेच्या चार मतदारसंघांसाठी 15 हजार 694 यंत्रंचा वापर 7क् लाख 61 हजार 368 मतदारांसाठी झाला होता. यानुसार, आगामी निवडणुकीसाठी यंत्रणा सतर्क झाली असून एकेक काम ते हातावेगळे करण्यात गुंतले आहेत.
निवडणुकीदरम्यान कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी पुणो येथील यशदा या प्रशिक्षण केंद्रात राज्यातील संबंधित अधिका:यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मतदारसंघांसाठी लागणारे स्कॅनर, प्रिंटर, फॅक्स, झेरॉक्स मशीन आदी साहित्य भाडेतत्त्वावर घेण्यासाठी संबंधित पुरवठादारांकडून निविदा मागवल्या आहेत़
च्चिन्हांकित मतदार याद्यांची छपाई, कार्डपेपर मुखपृष्ठ, पोस्टल बॅलेटचे तीन प्रकारच्या नमुन्यांचे छापील रंगीत लिफाफे आदी साहित्य खरेदी करण्याची तयारी सुरू झाली आहे.
च्याशिवाय, मतदारसंघ कार्यालये, मतदान केंद्रे आदी ठिकाणी लागणा:या जेनेरिक प्रथमोपचार औषधी व साहित्यपुरवठा करणा:यांचा शोध घेतला जात आहे.
च्याद्वारे बॅण्डेज, ओआरएस, ग्लुकोज पावडर, पोविडन आयोडिन आदींसह हे औषधी साहित्य ठेवण्यासाठी प्लास्टिक पिशव्या आदी साहित्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.