शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:57 IST

आरक्षणाला धक्का लागू देणार नाही

मुंबई : ओबीसी समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी या समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कुठलीही ठोस घोषणा केली नाही, त्यांनी आमची घोर निराशा केली, अशी टीका ओबीसी नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.आजच्या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, बहुजन विकास विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्ता भरणे आणि ओबीसी नेते, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला आपले सरकार कोणताही धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील व निधीही प्राधान्यक्रमानुसार दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.ओबीसी संघर्ष समितीचे जे.डी. तांडेल यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, एका विशिष्ट समाजाच्या मागण्या लगेच मान्य केल्या जातात आणि ओबीसींना न्याय दिला जात नाही. आमची आज मंत्रिमंडळ उपसमितीवर मुख्यमंत्र्यांनी बोळवण केली, आम्ही खूप अपेक्षा घेऊन आलो होतो. मुख्यमंत्री सकारात्मक होते; पण त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांना सांगितले की, एमपीएससीची रविवारची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली. मराठा आरक्षणाच्या विषयाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आजच्या बैठकांना प्रकाश शेंडगे, शंकरदादा पाटील, चंद्रकांत बावकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण