पालिकेचे मंत्र्यांना साकडे
By Admin | Updated: September 4, 2014 02:09 IST2014-09-04T02:09:17+5:302014-09-04T02:09:17+5:30
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दानवे यांनी दिले आहे.

पालिकेचे मंत्र्यांना साकडे
नाशिक : कुंभमेळ्यासाठी राज्य सहकार्य करण्यास तयार नसल्याने आता केंद्र शासनानेच भरघोस निधी द्यावा, अशी मागणी भाजपा आणि मनसेने केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दानवे यांनी दिले आहे.
खासगी दौ:यानिमित्ताने येथे आलेल्या दानवे यांची महापौर यतिन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस सीमा हिरे आदींनी भेट घेतली. नाशिकमध्ये 2क्15-16 मध्ये कुंभमेळा होणार असून, त्यासाठी 2,378 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यात नाशिक महापालिकेचा 1,क्52 कोटी रुपयांचा आराखडा आहे. केंद्राने अलाहाबाद कुंभमेळ्याठी 1,1क्क् कोटी रुपयांची मदत केली होती. गुरूद्दा गदी सोहळ्यासाठी 9क्क् कोटी रुपयांचा निधी नांदेड महापालिकेला दिला होता. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेला निधी मिळावा, अशी मागणी यतिन वाघ आणि सतीश कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे केली. त्यावर दानवे यांनी पंतप्रधानांच्या भेटीची तारीख लवकरच कळविली जाईल. त्यानंतर महापालिकेच्या शिष्टमंडळाने दिल्लीस यावे आणि तेथे बैठकीत निधीचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.(प्रतिनिधी)