शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CAA: संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडा - मल्लिकार्जुन खर्गे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 18:34 IST

राजकीय पक्ष विचारधारेवर चालतात. पदापेक्षा विचारधारा महत्त्वाची आहे.

नागपूर - संविधानामुळे आपल्या देशात लोकशाही रूजली आणि वाढली. हेच संविधान बदलून देशात हुकुमशाही आणण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव आहे. संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा डाव हाणून पाडावा. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन काँग्रेस नेते महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. 

आज नागपूर येथे यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये ते बोलत होते. या बैठकीत खर्गे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून सद्य राजकीय परिस्थिती व संघटनात्मक कार्याची माहिती घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राजकीय पक्ष विचारधारेवर चालतात. पदापेक्षा विचारधारा महत्त्वाची आहे. काँग्रेस पक्षात काम करणा-या कार्यकर्त्यांना संधी मिळते त्यामुळे सर्वांनी गट तट विसरून एकत्रितपणे संघटना मजबूत करावी आणि भाजपच्या धर्मांध विचारधारेचा पराभव करावा असं त्यांनी सांगितले.  

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा विचार आणि काँग्रेसचा कार्यकर्ता ही पक्षाची खरी ताकद आहे. कार्यकर्ता मजबूत असेल तर संघटना बळकट होते. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देणार देऊन राज्यात पक्ष संघटना मजबूत करू.  तत्पूर्वी सकाळी नागपूर विधानभवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत व विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली.

दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेसने दिल्लीत भारत बचाव रॅली काढली होती. यावेळीही काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. संविधान वाचविण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागेल, जर आज आपण आवाज उचलला नाही तर इतिहास कधीही आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरुन तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. केंद्र सरकारच्या मनमानी कारभारावर टीका करत काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांना भविष्यात आंदोलनासाठी तयार राहावं अशा सूचना दिल्या होत्या.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक