कॉ. पानसरे हत्येपूर्वी विनय पवारनं केली होती टेहळणी
By Admin | Updated: September 8, 2016 18:17 IST2016-09-08T18:17:38+5:302016-09-08T18:17:38+5:30
सातारा जिल्ह्यातील उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील संशयित व फरार विनय बाबुराव पवार याने कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात टेहळणी केली.

कॉ. पानसरे हत्येपूर्वी विनय पवारनं केली होती टेहळणी
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 8 - ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक असलेला सातारा जिल्ह्यातील उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील संशयित व फरार विनय बाबुराव पवार याने कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात टेहळणी केली. त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी पानसरे हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र सिंह तावडे याला कसबा बावडा येथील न्यायसंकुलमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणीस्तर यु. बी. काळपागर यांच्या न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे व तपास अधिकारी तथा अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी हा युक्तिवाद केला.
तावडेची आठ दिवस पोलिस कोठडीची मुदत न्यायालयाने वाढविली. १६ सप्टेंबरपर्यत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान,पानसरे हत्येतील संशयित समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्यानंतर तिसरा संशयित सनातनचा साधक व तावडेचा साथीदार विनय पवार याला पोलिसांनी आरोपी केले आहे.