आणखी २३ वर्षे द्यावा लागणार सी-लिंकचा टोल
By Admin | Updated: March 23, 2015 02:11 IST2015-03-23T02:11:18+5:302015-03-23T02:11:18+5:30
वांद्रे-वरळी सी-लिंकच्या टोलदरात वाढ करण्याचा निर्णय एमएसआरडीसीकडून (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) घेण्यात आला आहे.

आणखी २३ वर्षे द्यावा लागणार सी-लिंकचा टोल
मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंकच्या टोलदरात वाढ करण्याचा निर्णय एमएसआरडीसीकडून (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) घेण्यात आला आहे. एकेरी प्रवासासाठी पाच रुपये वाढ करण्यात येणार असून, मासिक पासमध्ये २५0 रुपये वाढ करण्यात येणार आहे. मुळात ३0 वर्षे टोल भरण्याचा करार असून, यातील सात वर्षेच टोलवसुलीची झालेली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना यापुढे टोलवाढीचा फटका बसत राहणार आहे.
सी-लिंकच्या प्रकल्पाची किंमत ही सुरुवातीला १,६३४ कोटी रुपये होती आणि त्यानंतर प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्याच्या किमतीत वाढ झाली. जोपर्यंत प्रकल्पाची किंमत वसूल होत नाही, तोपर्यंत टोलवसुली सुरूच राहणार आहे. यासाठी ३0 वर्षे टोलवसुलीचा करार एमएसआरडीसीचा झालेला आहे. २00९ सालापासून दर तीन वर्षांनी सी-लिंकच्या टोलदरात वाढ केली जात असून, आतापर्यंत तीन वेळा टोलवसुली झालेली आहे. ३0 वर्षांपैकी फक्त सात वर्षेच टोलवसुली झाल्याने आणखी २३ वर्षे टोलवसुलीचा भार सोसावा लागणार आहे. येत्या १ एप्रिलपासून सी-लिंकच्या टोलदरात वाढ होत असून, एकेरी प्रवासासाठी ५ रुपयांची वाढ आहे. त्यामुळे ५५ रुपयावरून टोल ६0 रुपये होईल. तर दुहेरी प्रवासासाठी ८२.५0 रुपयांवरून ९0 रुपये होईल, असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. मासिक पासच्या दरातही वाढ झाली असून ५0 ट्रिप्ससाठी आता २ हजार ७00 रुपये मोजावे लागतील.
30वर्षे टोलवसुलीचा करार असून, तसा अध्यादेशच आहे. सी-लिंकवरील टोलवसुली २00९ पासून होत आहे. आता १ एप्रिलपासून नवे दर लागू होतील, असे एमएसआरडीसी व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी सांगितले.
60येत्या १ एप्रिलपासून सी-लिंकच्या
टोलदरात वाढ होत असून, एकेरी प्रवासासाठी
५ रुपयांची वाढ आहे. त्यामुळे ५५ रुपयांवरून टोल
६0 रुपये होईल.