कॉ. गोविंद पानसरे यांचं मुंबईत निधन
By Admin | Updated: February 21, 2015 01:38 IST2015-02-20T23:55:59+5:302015-02-21T01:38:43+5:30
परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ नेते, भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य कॉ. गोविंद पानसरे यांचे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास निधन झाले.

कॉ. गोविंद पानसरे यांचं मुंबईत निधन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ नेते, भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य कॉ. गोविंद पानसरे यांचे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये अज्ञातांनी गोळीबार केला होता व या हल्ल्यात पानसरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते.
गेल्या चार दिवसापासून पानसरे यांच्यावर कोल्हापुरमध्ये उपचार करण्यात येत होते. परंतू पुढील उपचारासाठी पानसरे यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दुपारी हलविण्यात आले होते. पुढील उपचार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार होता. कोल्हापूरमधून मुंबईला हलविण्याला काही तासांचा अवधी लोटत नाही तोच पानसरे यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, पाच दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप या हल्ल्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.