अलविदा... प्रा. मधुकर तोरडमल !
By Admin | Updated: July 4, 2017 05:54 IST2017-07-04T05:54:45+5:302017-07-04T05:54:45+5:30
रंगभूमीवरील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांना समस्त नाट्यसृष्टी आणि तमाम नाट्यरसिकांनी सोमवारी

अलविदा... प्रा. मधुकर तोरडमल !
रंगभूमीवरील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांना समस्त नाट्यसृष्टी आणि तमाम नाट्यरसिकांनी सोमवारी अखेरचा निरोप दिला. जुहू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी संध्याकाळी त्यांचे देहावसान झाले होते.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह नाट्यसृष्टीतील मान्यवरांनी मधुकर तोरडमल यांचा अखेरचा निरोप घेतला. ज्येष्ठ रंगकर्मी आशालता वाबगावकर, सविता मालपेकर, विजय गोखले, मोहन जोशी, रमेश भाटकर, वंदना गुप्ते, उपेंद्र दाते, संजय मोने, रोहिणी हट्टंगडी, अश्विनी भावे, विजय केंकरे, प्रदीप पटवर्धन, अविनाश खर्शीकर, लता नार्वेकर, सुनील तावडे, सुशांत शेलार, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अतुल परचुरे, राजन पाटील अशा अनेक रंगकर्मींनी त्यांना या वेळी सुमनांजली वाहिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव जुहू स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे दुपारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.