शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री व्यस्त, उद्धव ठाकरे दीड तास वाट पाहून परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 05:59 IST

एरवी इतरांना ताटकळत ठेवणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ताटकळत बसण्याची पाळी आली.

मुंबई : एरवी इतरांना ताटकळत ठेवणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ताटकळत बसण्याची पाळी आली. शिवसेना आमदारांच्या विकास निधीसंदर्भात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार होते. परंतु मुख्यमंत्री विधानसभेच्या कामकाजात अडकून पडल्याने ही भेट होऊ शकली नाही. विधान भवनाजवळील शिवसेनेच्या कार्यालयात दीडएक तास वाट पाहून उद्धव मग ‘मातोश्री’वर परतले.

उद्धव यांनी मध्यंतरी शिवसेना आमदारांच्या विभागवार बैठकी घेतल्या तेव्हा आमदारांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये पुरेसा विकास निधी मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यासाठी उद्धव हे आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार होते. सायंकाळी ५.४५ची वेळ भेटीसाठी ठरली होती. त्यानुसार ते मातोश्रीवरून निघाले. पण मुख्यमंत्र्यांना सभागृहात जरा वेळ लागणार असल्याचे कळल्यावर सायंकाळी ७पर्यंत ते विधान भवनाजवळील शिवसेनेच्या ‘शिवालया’त बसून होते. मुख्यमंत्री विधानसभेतच अडकून पडल्याने भेट होऊ शकली नाही. शेवटी कंटाळून उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना होत असतानाच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व भेट न झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आपण लवकरच भेटू, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले.

वाघ-सिंह 2019 मध्येही एकत्र, मुख्यमंत्र्यांकडून युतीचे संकेत. 

2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही, याकडे महाराष्ट्राचे डोळे लागून राहिलेले असताना मुख्यमंत्र्यांनी युतीचे संकेत दिले आहेत. विधानसभात विरोधकांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस युतीबाबत सकारात्मक होते.'उंदराने पोखरण्याची आम्हाला भीती नाही कारण आम्ही वाघ आणि सिंह एकत्र आहोत. वाटेत उंदीर येतील पण आम्ही त्यांचा निःपात करु आणि 2019 ला ही आम्ही एकत्रित येऊ' असे स्पष्ट संकेतच देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 'विरोधी पक्षनेते तुम्ही उत्तम उंदीर पुराण सांगितलं. तुमचं उंदीरपुराण रंजक आणि कल्पक आहे. तुम्ही उत्तम पटकथाकार आहात, यात शंका नाही' असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस