शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश

By admin | Updated: February 3, 2017 00:48 IST

पिराचीवाडीत छापा; बोगस डॉक्टराचे पलायन; मदतनीस, ग्राहक दाम्पत्य ताब्यात

कोल्हापूर : गर्भलिंग निदान विरोधी पथकाने (पीसीपीएनडीटी) बुधवारी मध्यरात्री पिराचीवाडी (ता. कागल) येथील डोंगराळ भागातील एका घरावर छापा टाकून गर्भलिंग तपासणी केंद्राचा पर्दाफाश केला. यावेळी ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील एका दाम्पत्याला व एका मदतनीस महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले, तर रोख दोन लाख रुपये, तीन आलिशान मोटारी जप्त करण्यात आल्या. दरम्यान, या केंद्राचा सूत्रधार संशयित बोगस डॉक्टर पिंटू रोडे (रा. पिराचीवाडी, ता. कागल) हा छापा पडताच अंधाराचा फायदा घेत घराची कौले काढून पळून गेला. या छाप्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कागल ग्रामीण रुग्णालय आणि कागल पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. बुधवारी रात्री अकरा वाजल्यापासून गुरुवारी पहाटेपर्यंत रात्रभर ही कारवाई सुरू होती.याबाबत माहिती अशी की, कागल तालुक्यातील सावर्डे परिसरात पिराचीवाडी हे गाव डोंगरात वसले आहे. या गावातील एका घरात बोगस डॉक्टरांद्वारे रात्रीच्या वेळी गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याची माहिती गर्भलिंग निदानविरोधी पथकाला एक आठवड्यापूर्वी मिळाली होती. त्यानुसार या पथकाने प्रथम या मिळालेल्या माहितीची सत्यता तपासली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कागल ग्रामीण रुग्णालय आणि कागल पोलिसांचे पथक तयार करून त्यांनी गर्भलिंग तपासणीसाठी एक दाम्पत्य बनावट ग्राहक म्हणून तयार केले. त्यांनी बुधवारी रात्री संबंधित गर्भलिंग तपासणी करणाऱ्या पिंटू रोडे या बोगस डॉक्टराला मोबाईलवरून फोन करून गर्भलिंग तपासणी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर रोडे यांने या दाम्पत्याला रात्री १० वाजता केनवडे फाटा येथे येण्यास सांगितले. त्यानुसार संबंधित दाम्पत्य केनवडे फाटा येथे पोहोचले असता तेथे रोडे याचे सहकारी वाट पाहत थांबले होते. त्या सहकाऱ्यांनी या दाम्पत्याला डोंगरवस्तीतील पिराचीवाडी येथे डॉक्टराच्या घरी नेले. त्यावेळी त्या दाम्पत्यापाठोपाठ तेथे गर्भलिंग निदानविरोधी पथकही परिसरात पोहोचले; पण संशयीत बोगस डॉक्टर पिंटू रोडे याला छाप्याबाबत संशय आल्याने त्याने मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घराची कौले काढून पाठीमागील शेतात उडी मारून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. काही वेळातच पथकाने त्या घरावर छापा टाकला असता तेथील रोडे याची महिला मदतनीस आणि गर्भलिंग निदान तपासणीसाठी आलेल्या एका दाम्पत्याला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान, त्याच घराबाहेर मध्यरात्रीच्या सुमारास आणखी तीन वेगवेगळ्या आलिशान मोटारींतून काहीजण गर्भलिंग तपासणीसाठी आले होते. पोलिसांनी या तीनही मोटारी जप्त केल्या. या पथकाने या घराची झडती घेत साहित्य जप्त केले.-रात्रभर कारवाईबुधवारी मध्यरात्री बारा वाजता छापा टाकल्यानंतर तपासणी पथकाची पहाटे पाच वाजेपर्यंत अखंडपणे कारवाई सुरू होती. या दरम्यान पथकाने मध्यरात्रीच संपूर्ण घराची झडती घेतली. परिसरातील गावात जाऊन फरार झालेल्या संबंधित बोगस डॉक्टर पिंटू रोडे याची माहिती मिळविली. त्यामध्ये त्या डॉक्टराकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचे तसेच तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचीही माहिती पुढे आली आहे. छाप्यात घटनास्थळी सांकेतिक खुणांच्या चिठ्ठ्या, गर्भलिंग तपासणीचे साहित्य, यंत्रसामग्री, नोंदवही असे साहित्य मिळाले.सांकेतिक भाषेत रिपोर्टगर्भलिंग निदान तपासणी केल्यानंतर बोगस डॉक्टर रोडे हा रुग्णाला एक चिठ्ठी देत असे. त्यामध्ये मुलगी असेल तर इंग्रजीतील नऊ व मुलगा असेल तर इंग्रजीतील सात असे सांकेतिक भाषेत लिहिले जात होते.गर्भपाताचीही शक्यतापिंटू रोडे याच्याकडे गर्भलिंग निदान तपासणीसह गर्भपात केला जात असल्याचीही शक्यता छापा टाकलेल्या पथकाने व्यक्त केली. त्याबाबतही माहिती घेण्याचे काम सुरू होते.१० ते २५ हजार रुपये फीया बोगस डॉक्टराकडून गर्भलिंग निदान करून घेण्यासाठी तो दाम्पत्याकडून १० हजारांपासून २५ हजारांपर्यंत पैसे घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे.कोट...अशा बोगस डॉक्टरांकडे वैद्यकीय शाखेची कोणतीही पदवी नसताना समाजातील उच्चभ्रू व सुशिक्षित नागरिकही त्यांच्याकडे जाऊन महिलांचा जीव धोक्यात घालत आहेत. याशिवाय अशा डॉक्टरांकडून भ्रूणहत्या केली जाते. अशा बोगस डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाऊ नये. जेथे असा प्रकार सुरू असेल त्याची त्वरित कल्पना आरोग्य खात्यास द्यावी. - डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सकगुरुवारी रात्री पर्यंत गुन्हा दाखल नाहीकागल : पिराचीवाडी येथे गर्भलींग तपासणीचा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर कागल पोलिसांनी गुरुवारी दिवसभर तपासाची चक्रे फिरविली. मात्र याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र, एका महिलेची चौकशी सुरू होती. तर सोनोग्राफी मशीन, इतर कागदपत्रे, साहित्यांसह काही रोख रक्कम आणि घटनास्थळाजवळ सशंयास्पदरीत्या आढळलेली (एमएच०९ एक्यू ५५७७) ही होंडा सिटी कारही ताब्यात घेण्यात आली. इतर दोन वाहने तेथेच ताब्यात घेऊन ठेवली आहेत. कागल पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश कवितके यांच्या नेतृत्वाखालील वसंत पाटील, शेखर शिंदे, सोमनाथ भोई, सुवर्णा साळोखे, अशोक पवार, धनंजय तळपाडे, दीपक अष्टेकर यांनी या कारवाईत भाग घेतला. तर पोलिस निरीक्षक संतोष पवार यांना पहाटे तीन वाजता पन्हाळा येथून तपासकामी पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी हर्ष पोद्दार यांनी कागल पोलिस ठाण्यास भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांबरोबर कागल ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, व्ही. एस. पुनंदीकर, पांडुरंग कोकणे, अ‍ॅड. गौरी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती भालकर, दीपक चौगुले हे या कारवाईत पुढे होते.धाडसी कारवाई...वैद्यकीय पथक पिराचीवाडीला वेषांतर करून गेले होते. तेथील सर्व माहिती घेऊन पोलिसांना पाचारण केले. पोलिसही वेषांतर करून गेले होते. या केंद्राजवळ १८ ते २० वयोगटातील जवळपास २० युवक हजर होते. या पथकाने धाडसी कारवाई केली.सीमाभाग चर्चेत...कागल पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी सिद्धनेर्ली आणि बिद्री येथे अशी कारवाई झाली आहे. बिद्रीचे प्रकरण खूप गाजले. याशिवाय जिल्ह्यात कूर, दारवाड, भोगावती, पेठवडगाव, कोल्हापूर शहरातही अशी कारवाई झाली आहे. विशेषत: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात हे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.टोळी असण्याची शक्यतापिंटू रोडे हा फोन केल्यानंतर रात्री उशिराची वेळ देत होता; पण तो घरचा पत्ता न देता ग्राहकांना पिराचीवाडी परिसरातील गोरंबे, केनवडे, आदी फाट्यांवर येऊन थांबण्यास सांगत असे. ग्राहक पोहोचण्यापूर्वीच सांगितलेल्या ठिकाणी तिथे संबंधित डॉक्टरांचे सहकारी दुचाकीवरून थांबलेले असायचे. हा डॉक्टर ग्राहकांना रोज वेगवेगळ्या ठिकाणी येण्यास सांगत असे.दोन लाखांची रोकड, तीन मोटारी जप्तया छाप्यात पिंटू रोडे याच्या घरी पथकाला दोन लाख रुपयांची रोकड मिळाली; तसेच गर्भलिंग तपासणीसाठी आलेल्या ग्राहकांच्या एक होंडा सीटी आणि दोन अल्टो अशा तीन आलिशान मोटारी मिळाल्या. त्या जप्त केल्या.