काँग्रेसतर्फे उद्यापासून राज्यभर ‘पर्दाफाश आंदोलन’: अशोक चव्हाण

By Admin | Updated: August 20, 2015 23:12 IST2015-08-20T23:12:24+5:302015-08-20T23:12:24+5:30

या आंदोलनातून भाजपचा दुटप्पीपणा उघड करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

'Busted Movement' in the state from tomorrow, Congress: Ashok Chavan | काँग्रेसतर्फे उद्यापासून राज्यभर ‘पर्दाफाश आंदोलन’: अशोक चव्हाण

काँग्रेसतर्फे उद्यापासून राज्यभर ‘पर्दाफाश आंदोलन’: अशोक चव्हाण

कोल्हापूर : भाजपच्या केंद्रातील व राज्यातील सरकारचा पर्दाफाश करणारे आंदोलन काँग्रेसतर्फे येत्या शनिवार (दि. २२) पासून राज्यभर सुरू करणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे केली.
या आंदोलनातून भाजपचा दुटप्पीपणा उघड करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्यभर दुष्काळाचे गडद सावट असताना त्याबद्दल कोणत्याच उपाययोजना न करता हाताची घडी घालून बसलेल्या सरकारवर त्यांनी टीकेची तोफ डागली.
येथे राजीव गांधी सद्भावना दौडच्यानिमित्ताने आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी ते आले होते. सायंकाळी त्यांनी शासकीय विश्रामधामवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, सुरेश कुराडे, प्रल्हाद चव्हाण, सत्यजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले,‘हे आंदोलन २२ ते २५ आॅगस्टदरम्यान आम्ही करू. त्यामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन, मेळावे, सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रसारमाध्यमांशी संवाद या माध्यमातून भाजपच्या धोरणांचा पर्दाफाश करू. संसदेचे अधिवेशन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी चालवू दिले नाही म्हणून भाजपने प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात आंदोलन सुरू केले आहे. त्यास
प्रत्युत्तर देण्याचे काम काँग्रेसतर्फे केले जाईल.

....म्हणे महाडिक-सतेज हा वैचारिक मतभेद
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमधील बेदिलीबद्दल पत्रकारांनी चव्हाण यांना विचारणा केली. ते म्हणाले,‘आमदार महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यात वाद नसून ते वैचारिक मतभेद आहेत. या दोघांशी बोलून तो सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न करू.’
महाडिक यांची पाठराखण
काँग्रेसचे आमदार महाडिक यांचा मुलगा हा पक्षाच्या विरोधातील ताराराणी आघाडीचा निमंत्रक असल्याचे निदर्शनास आणून दिले असता प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी त्यात काय गैर नसल्याचेच अप्रत्यक्षरीत्या सांगून टाकले, असे एकाच कुटुंबातील विविध पक्षांत काम करणारे नेत्यांची राज्यात अनेक उदाहरणे आहेत. शिवाय आमदार महाडिक माझ्या स्वागताला आले होते. त्यांनीच मला माझा ताराराणी आघाडीशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे नगरसेवक या आघाडीकडे गेले असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर तिथे बसलेले सतेज पाटील यांनी खुलासा केला. जे मूळचे ताराराणी आघाडीचे होते तेच परत त्या आघाडीकडे गेले आहेत. काँग्रेसचे कोणीही नगरसेवक या आघाडीकडे गेले नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'Busted Movement' in the state from tomorrow, Congress: Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.