व्यापार्यांनीच केले व्यापार्याचे अपहरण!
By Admin | Updated: August 19, 2014 11:11 IST2014-08-19T11:00:04+5:302014-08-19T11:11:11+5:30
व्यापार्यांनीच सुपारी देवून व्यापा-याच्या अपहरणाचा डाव रचल्याची घटना घडली आहे.

व्यापार्यांनीच केले व्यापार्याचे अपहरण!
>संगमनेर (जि. अहमदनगर) : संगमनेरमधील व्यापार्याचे अपहरण करून खंडणी उकळणार्या तिघा खंडणी बहाद्दरांना संगमनेर शहर पोलिसांनी पुणे येथून सापळा रचून अटक केली. व्यापार्यांनीच सुपारी देवून अपहरणाचा डाव रचल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे.
अपहृत व्यापारी निंबाराम देवाशी सुखरूप असून या अपहरण नाट्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. राजस्थानातील व्यापारी राजू (पूर्ण नाव समजलेले नाही) इलेक्ट्रॉनिक्सचा माल पुरवतात. माल देण्याच्या बहाण्याने त्यांनी नारायणगावच्या (पुणे) काही दुकानदारांसह संगमनेरमधील एका इलेक्ट्रीकल्स दुकानाचे मालक देवाशी यांच्याकडून आगावू पैसे घेतले होते. मात्र माल आणून न देता पैसे घेवून राजू राजस्थानला पळून गेला. तेव्हापासून नारायणगावचे व्यापारी त्याचा शोध घेत होते. देवाशी हे राजूचे भागीदार असल्याची माहिती व्यापार्यांना मिळाल्यानंतर त्यांनी अपहरणाचा कट रचला.
कुंदन नंदकुमार वारूळे (रा. वारूळवाडी, ता.जुन्नर), स्वप्नील सुरेश भुजबळ (रा. आनंदवाडी, नारायणगाव) व जालिंदर मारूती वाळूंज (रा. नांदुरगाव, ता. आंबेगाव) यांनी देवाशी यांचे त्यांच्या दुकानातून अपहरण केले व सुटकेसाठी त्यांच्या ४0 लाखांची मागणी केली.