गोवंडी येथे व्यवसायिकाला लुटले

By Admin | Updated: May 14, 2014 01:31 IST2014-05-13T19:00:42+5:302014-05-14T01:31:34+5:30

रिक्षातून घरी जात असलेल्या बाळासाहेब बेडकाळे या व्यवसायिकाला चाकूचा धाक दाखवत लुटण्याची घटना सोमवारी रात्री गोवंडी परिसरात घडली.

The businessman was robbed in Gowandi | गोवंडी येथे व्यवसायिकाला लुटले

गोवंडी येथे व्यवसायिकाला लुटले

मुंबई: रिक्षातून घरी जात असलेल्या बाळासाहेब बेडकाळे या व्यवसायिकाला चाकूचा धाक दाखवत लुटण्याची घटना सोमवारी रात्री गोवंडी परिसरात घडली. देवनार पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक करुन लुटलेले सोने हस्तगत केले आहे.
चेंबूरच्या घाटलेगाव परिसतात राहणारे बेडकाळे सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गोवंडीवरुन चेंबूरच्या दिशेने येत होते. दरम्यान येथील वामन तुकाराम पाटील मार्गावर राहूल रोहिरे (२७) हा आरोपी अचानक त्यांच्या रिक्षासमोर आल्याने रिक्षाचालकाने ब्रेक दाबून रिक्षा थांबवली. मात्र रिक्षा थांबताच त्यांनी पाठीमागे बसलेल्या बेडकाळे यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील ८७ हजार रूपये किमतीची तीन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. बेकाळे यांनी रिक्षामधून उतरुन आरोपीचा पाठलाग केला. मात्र तो पळून गेला. त्यामुळे त्यांनी आज सकाळी पुन्हा एकदा घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता तो लुटारु गोवंडीच्या निबोंणी बाग परिसरात राहात असल्याची माहिती एका रहिवाशाने त्यांना दिली. त्यानुसार त्यांनी देवनार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ एक पथक त्या परिसरात पाठवून आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीकडून पोलिसांनी सोनसाखळी हस्तगत केली आहे. मात्र त्यामधील लॉकेट एका दुकानदाराला विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Web Title: The businessman was robbed in Gowandi