औरंगाबादमध्ये बसस्थानकात लागलेल्या खाजगी बसेस कर्मचा-यांनी लावल्या पिटाळून, प्रवाशांचे प्रचंड हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 11:04 IST2017-10-17T10:33:18+5:302017-10-17T11:04:40+5:30
गोरगरीब आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एस.टी. बससेवा आज सकाळपासून ठप्प झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे बसगाड्या बसस्थानकाबाहेर जाऊ देण्यात येत नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

औरंगाबादमध्ये बसस्थानकात लागलेल्या खाजगी बसेस कर्मचा-यांनी लावल्या पिटाळून, प्रवाशांचे प्रचंड हाल
औरंगाबाद : गोरगरीब आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एस.टी. बससेवा आज सकाळपासून ठप्प झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे बसगाड्या बसस्थानकाबाहेर जाऊ देण्यात येत नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.यातच मध्यवर्ती बसस्थानकात लावण्यात आलेल्या खाजगी बसेस एसटी कर्मचा-यांनी पिटाळून लावले.
एसटी कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. त्यास कर्मचा-यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने पहाटेपासूनच संपाचा परिणाम जाणवला. मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकात सकाळपासूनच प्रवाशांचे हाल होत आहे. बहुतेक प्रवाशांना संपाची कल्पना नसल्याने त्यांनी चौकशी कक्षावर धाव घेत आहे. परंतु बससेवा बंद असल्याची माहिती देण्यात येत आहे. एखादी तरी बस मिळेल या आशेने प्रवासी धडपडत करीत आहे.बस फे-या रद्द झाल्याने शेकडो प्रवासी तासनतास बसस्थानकात खोळंबले.
कर्मचा-यांच्या संपामुळे दिवाळीसाठी गावी जाणा-या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बस कधी जाणार? अशी विचारणा करीत प्रवासी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी गर्दी करीत आहे. यामध्ये ज्येष्ठ प्रवासी,लहान मुले आणि विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.
खाजगी वाहतुकदारांकडून लूट
बसस्थानकात तासनतास थांबूनही बस जाणार नसल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी खाजगी बसचा रस्ता धरीत आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोर खाजगी बसच्या रांगा लागल्या आहेत. परंतु अशा परिस्थितीत खाजगी वाहतुकदारांनी जादा भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. . एस.टी.कर्मचा-यांच्या संपामुळे नाईलाजाने प्रवाशांनी हा भुर्दंड सहन करून प्रवासाचा मार्ग धरत आहे.
शहर बससेवाही बंद
शहर बससेवाही बंद पाडण्यात आली. त्यामुळे शहरवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहर बस बंद राहिल्याने रिक्षाचालकही प्रवाशांकडून जादा पैसे आकारत आहेत.
बसस्थानकांत बसगाड्यांच्या रांगा
संपामुळे बसगाड्या बाहेर पडून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही बसस्थानकांमध्ये बसगाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत.