खंडाळा घाटात द्रुतगती मार्गावर बस उलटली
By Admin | Updated: November 24, 2014 03:01 IST2014-11-24T03:01:34+5:302014-11-24T03:01:34+5:30
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दस्तुरी जवळील अंडा पॉईट येथे वळणावर रविवारी सायंकाळी ८़४० च्या सुमारास ब्रेक निकामी झाल्यामुळे एसटी बस रस्त्यातच पलटी झाली.

खंडाळा घाटात द्रुतगती मार्गावर बस उलटली
लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दस्तुरी जवळील अंडा पॉईट येथे वळणावर रविवारी सायंकाळी ८़४० च्या सुमारास ब्रेक निकामी झाल्यामुळे एसटी बस रस्त्यातच पलटी झाली. बसमधील सुमारे १७ ते १८ प्रवाशी जखमी झाले़ सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही़
बोरघाट पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीची सोलापूर ठाणे बस रात्री ८़४० च्या सुमारास मुंबईच्या दिशेने जात होती. अमृतांजन पुलापासून उताराने जाताना दस्तुरी जवळील अंडा पॉईट येथील वळणावर गाडीचे ब्रेक निकामी झाले. बस रस्त्यांच्या शेवटच्या लेनवर पलटी झाली़ सर्व जखमींना खोपोली व खालापूर येथील खासागी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून खोपोली पोलीस पुढील तपास करत आहेत़ (वार्ताहर)