मुंबई जानेवाली बस प्लॅटफॉर्म पे खडी है!
By Admin | Updated: September 17, 2014 02:24 IST2014-09-17T02:24:18+5:302014-09-17T02:24:18+5:30
एकमेकांच्या गावात उगाच जास्त लक्ष घालू नका. त्या नादात आपली बस निघून जाईल. राज : नाशकात जसा सपोर्ट केलात मला, तसं बसमध्येही जागा पकडून ठेवा माङयासाठी.

मुंबई जानेवाली बस प्लॅटफॉर्म पे खडी है!
(स्थळ : एस. टी. स्टॅण्ड. आचारसंहितेमुळे
बरेच नेते मुंबईच्या बसची वाट पहात फलाटावर थांबलेले.)
आबा : प्रचंड गर्दी राव. बंदोबस्त लावावा लागेल.
जयंतराव : बंदोबस्त तुमच्या पट्टय़ातच ठेवा. घोरपडेंनी म्हणो भलतीच टाईट फिल्डिंग लावलीय.
अजितदादा : एकमेकांच्या गावात उगाच जास्त लक्ष घालू नका. त्या नादात आपली बस निघून जाईल.
राज : नाशकात जसा सपोर्ट केलात मला, तसं बसमध्येही जागा पकडून ठेवा माङयासाठी.
आठवले : मी तर अगोदरच तीन-चार ‘सिटांचं रिझव्र्हेशन’ करून ठेवलंय बुवा.
उद्धो : (एस. टी.वर लक्ष ठेवत) पण तुमच्या जागांमुळं अख्खी बस माङया हातातून सुटायची वेळ आलीय.
देवेंद्रपंत : (कुत्सितपणो) ‘कंडक्टर मीच.. अन् ड्रायव्हर पण मीच’ असा हट्ट धरला तर दुसरं काय होणार ?
थोरले काका : (कपाळावर आठय़ा पण आतून खुश) काय कलकलाट चाललाय या भगव्या प्रवाशांचा? बस अजून लांब; पण आतापासूनच भांडणं चाललीयंत यांची.
सुशीलकुमार : (निश्वास सोडत) पाच-दहा वर्षापूर्वी अशीच ‘भाऊगर्दी’ असायची बघा आपल्याही प्लॅटफॉर्मवर. आता वारं उलटं फिरलंय.
पृथ्वीराज : बस आली की तुम्ही जागा पकडा पटापटा. मी तिकिटं फाडतो धडाधडा. शेवटच्या टप्प्यात फायली कम्प्लीट केल्यासारख्या.
गडकरी : पण तुम्ही कशाला आता
तिकीट काढताय ? तुमची बस थोडीच शेवटाला पोहोचणारंय ?
(एवढय़ात बस प्लॅटफॉर्मवर लागलेली.)
विनोदराव : (आपल्यासोबतच्या इच्छुक प्रवाशांना) तुम्ही खिडकीतून ‘भगवा पंचा’ आत टाकून जागा पकडा. नंतर आपण त्यावर निवांत बसू.
शेट्टी : (दचकून) ऑँ? ही इच्छुक माणसं तर हातात ऊस घेऊन माङयासोबत मुंबईला निघालीत.
जानकर : (आश्चर्यानं) काय म्हणता काय ? हीच माणसं माङयाही संपर्कात.
उद्धो : (रागारागानं पुढं सरकत) चेष्टा करताय काय तुम्ही तिघं माझी? नीट बघा. प्रत्येकाच्या मनगटात माझंच ‘शिवबंधन’ दिसतंय. म्हणूनच सांगतोय, बसमध्ये सगळ्यात जास्त माङयाच जागा. माझीच माणसं.
थोरले काका : (चुकचुकत) ही सारी
इच्छुक माणसं खरंतर आमची. अन् हे म्हणताहेत ‘माझी-माझी’.
माणिकराव : (भूतकाळात रमत) दहा-पंधरा वर्षात तुमची झालेली हो.. पण मुळात आमचीच नां ? जाऊ दे चला. अगोदर आत घुसा. बस सुटायची वेळ झालीय. चर्चा नंतर करू.
- सचिन जवळकोटे