शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी नऊनंतरच्या शाळेला बसचालकांचाही विरोध; सरकारने सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 07:14 IST

सकाळी आठनंतर शहरांमध्ये होते प्रचंड वाहतूक कोंडी, पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरविण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. वाहनचालकांची मागणी

रेश्मा शिवडेकरमुंबई : सकाळच्या वाहतूक कोंडीत शाळांच्या बसगाड्या चालविणे अवघड असल्याचे सांगत स्कूल बस चालकांकडून पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरविण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून सक्तीचे धोरण अवलंबल्यास आंदोलनाचा इशारा बसचालक संघटनेने दिला आहे.

मुंबईत अनुदानित, खासगी शाळांमधील सुमारे ८० टक्के विद्यार्थी शाळेत ये-जा करण्यासाठी खासगी बस किंवा व्हॅन, रिक्षांचा वापर करतात. सकाळच्या वेळेत होणाऱ्या वाहतूक कोंडीत लहान मुलांचे हाल होणार आहेत, याकडे बसचालकांनी लक्ष वेधले आहे. शाळांच्या वेळांबाबतची सक्ती केल्यास बसचालकांचा आर्थिक भुर्दंड वाढणार आहे. सरतेशेवटी तो पालकांनाच सोसावा लागेल.  पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरविण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’चे (एसबीओए) अनिल गर्ग यांनी दिला.

आर्थिक भुर्दंड कसा?बसगाड्यांची संख्या वाढविली तरच बसचालकांना फेऱ्या वाढविणे शक्य होईल. बसगाड्या वाढल्या तर ती चालविण्याकरिता लागणारे मनुष्यबळ (उदा. चालक, मदतनीस, महिला सहकारी) देखील वाढवावे लागले. शिवाय इंधन खर्च वाढेल तो वेगळा. त्यामुळे फेऱ्यांची संख्या वाढविणे बसचालकांकरिता आर्थिक भुर्दंडाचे ठरणार आहे. बसचालक शेवटी हा खर्च पालकांच्या माथी मारणार. त्यामुळे वाहतूक सेवेवरील खर्चात वाढ होणार आहे.

बसचालकांचा विरोध का? मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरात कार्यालयात जाणाऱ्यांच्या गर्दीमुळे सकाळी आठनंतर वाहतूक कोंडी प्रचंड वाढते. त्याआधीच शाळेच्या बसगाड्या पहिल्या सत्रातील मुलांना शाळेत पोहोचवितात. त्यामुळे त्यांना कोंडीचा सामना करावा लागत नाही. दुपारी बसगाड्या दुपारच्या सत्रातील मुलांना शाळेत घेऊन येतात. त्यावेळी वाहतूक कोंडी तुलनेने कमी झालेली असते. याच गाड्यांतून पहिल्या सत्रातील मुलांना शाळेतून घरी सोडले जाते. त्यामुळे बसगाड्यांच्या खेपा वाचतात. पर्यायाने शहरातील वाहतूक कोंडीत कमी भर पडते. मुंबईत दिसणारे हे चित्र इतर शहरांतही आहे; परंतु नऊनंतर पाचवीपर्यंतचे वर्ग भरण्याची सक्ती झाल्यास ही घडी विस्कटण्याची भीती आहे.

टॅग्स :Schoolशाळा