पोस्टर लावण्यास विरोध करणा-या बस चालकास बेदम मारहाण
By Admin | Updated: March 14, 2017 19:44 IST2017-03-14T19:44:51+5:302017-03-14T19:44:51+5:30
बसवर पोस्टर लावण्याच्या कारणावरून राज्य परिवहन महामंडळाच्या एका चालकास १० ते १५ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना

पोस्टर लावण्यास विरोध करणा-या बस चालकास बेदम मारहाण
>ऑनलाइन लोकमत
निलंगा, दि. 14 - बसवर पोस्टर लावण्याच्या कारणावरून राज्य परिवहन महामंडळाच्या एका चालकास १० ते १५ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना निलंगा आगारात मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
निलंगा आगारात एका बसवर व्हीएस पँथरच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे पोस्टर लावण्यासाठी कार्यकर्ते गेले होते. बसवर पोस्टर लावण्यास एसटीचे चालक सतीश तुगावे यांनी कार्यकर्त्यांना विरोध केला. त्यामुळे ‘तू विरोध का करतोस’ असे म्हणून दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर आगारातील सर्वच चालक व वाहकांनी काम बंद केले. मारहाण करणाºया आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. बस चालकास झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे जवळपास दोन तास निलंगा आगारात गोंधळ उडाला.