पुसदजवळ बस नदीत कोसळली,२० प्रवासी जखमी

By Admin | Updated: August 12, 2015 12:37 IST2015-08-12T09:38:30+5:302015-08-12T12:37:04+5:30

पुसद-उमरेखड रोडवरील कोप्रा फाट्याजवळील नदीत बस कोसळून अपघात झाला.

Bus collapses near Bus river, 20 passengers injured | पुसदजवळ बस नदीत कोसळली,२० प्रवासी जखमी

पुसदजवळ बस नदीत कोसळली,२० प्रवासी जखमी

>ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. १२ -  पुसद-उमरेखड रोडवरील कोपरा गावाजवळ बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात शाळकरी मुलांसह २० प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी ६.३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातावेळी बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह सुमारे ६० प्रवासी होते. गावक-यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले, यात २० जण जखमी झाले. जखमींवर पुसदच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा अपघात नेमका कशामुळे झाला ते स्पष्ट झाले नाही. 

Web Title: Bus collapses near Bus river, 20 passengers injured