कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ औरंगाबादेत फोडली बस
By Admin | Updated: July 18, 2016 20:18 IST2016-07-18T20:18:48+5:302016-07-18T20:18:48+5:30
ल्पवयीन तरुणींवर सामुहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचे तीव्र पडसाद औरंगाबादेत उमटले आहे

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ औरंगाबादेत फोडली बस
औरंगाबाद: कोपर्डी(ता.कर्जत,जि.अहमदनगर) येथील अल्पवयीन तरुणींवर सामुहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचे तीव्र पडसाद औरंगाबादेत उमटले आहे.याप्रकरणी अखील भारतीय शिवक्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी एपीआय कॉर्नर येथे एस.टी. महामंडळाच्या बस थांबवून बसच्या काचा हातोडा आणि दगडाने फोडल्या.या दगडफेकीनंतर पोलिसांनी संपूर्ण शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे.
कोपर्डी येथील रहिवासी असलेल्या नववीत शिकत असलेल्या मुलीवर सामुहिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींवर तात्काळ अटकेची कारवाई न केल्याने राज्यभर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. मराठा समाजातील विविध संघटना ठिक,ठिकाणी मोर्चे, धरणे आंदोलने करीत आहेत. औरंगाबादेतील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालासमोर धरणे धरली. हे आंदोलन सुरू असतानाच अखिल भारतीय शिवक्रांती सेनेचे अध्यक्ष सुनील कोटकर आणि पदाधिकाऱ्यांनी एपीआय कॉर्नर येथे एस.टी.महामंडळाच्या बसवर दगडफेक करुन काचा फोडल्या. कोपर्डी येथील घटनेचा निषेध केला. त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.