बीडमध्ये बसचा अपघात, 9 ठार

By Admin | Updated: June 11, 2017 12:03 IST2017-06-11T06:57:49+5:302017-06-11T12:03:05+5:30

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या धानो-यात एका बसचा अपघात होऊन नऊ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Bus accident in Beed, 9 killed | बीडमध्ये बसचा अपघात, 9 ठार

बीडमध्ये बसचा अपघात, 9 ठार

ऑनलाइन लोकमत

बीड, दि.11 - मुंबईहून बीडकडे येणारी खासगी बस पलटल्याने नऊ ठार आणि 26 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यातील धानोरा घाटात घडली. जखमींना अहमदनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील विलास जोगदंड या चिमुकल्याच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागलेला आहे. त्याच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.अपघाताची माहिती समजताच बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना अहमदनगर रुग्णालयात हलविले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अहमदनगरमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली. यावेळी त्यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले.

चालकाने मद्यप्राशन केले होते का? की त्याला झोप लागली, याचा शोध घेतला जाईल. तर या अपघातात  रशीद अब्दुल रज्जाक कुरेशी (६० रा.बाराभाई गल्ली अंबाजोगाई जि.बीड), आतिक खान मुनवर (३२ रा.हो.जवळा ता.केज जि.बीड), मेहरून निसा आमिन पटेल (३५ रा.मुंबई), आसिमा नजीम सय्यद (४५ मुंबई), सर्जेराव लक्ष्मण पवार (३० वाटीवाडा तांडा ता.धारूर जि.बीड), योगेश गौतम टकले (३० चिखली ता.आष्टी जि.बीड), पठाण बहादुर पठाण इस्माईल (६५ रा.बसवेश्वर जि.लातूर), सुनील मल्हारी कुंभारकर (४५ रा.कर्वेनगर, पुणे), चांद पाशा ताजोद्दीन पठाण (६६ रा.नेकनुर, ता.बीड) आदींचा मृत्यू झाला आहे.

तर रमाकांत चंद्रकांत केदारी (३० पुणे), प्रियंका अंगद जोगदंड (२३), अंगद शिवाजी जोगदंड (२६), सोनाली संतोष जोगदंड (१२), विलास अंगद जोगदंड (४ सर्व रा.दैठणा ता.अंबाजोगाई जि.बीड), आशा चांद सय्यद (४५ रा. नेकनूर) वंदना विजय सुर्यवंशी (२६), स्वप्नाली विजय सुर्यवंशी (सर्व रा.गौर ता. निलंगा जि.लातूर),  बाळासाहेब खाडे (४० देवळाली पानाची ता.आष्टी), तबसून मुज्जमील कुरेशी (२५), मुद्दसीर मुज्जमील कुरेशी (६, रा.अंबाजोगाई), उमेश ब्रम्हदास चव्हाण (२१ रा.अकोला जि.वाशिम),  बाबा गोरक्ष सरवदे (२७ रा.भुसुंदरगा जि.लातूर), शांताबाई ज्ञानोबा जाधव (५०), सुकन्या अशोक जाधव (२५) अथर्व अशोक जाधव (४), अनुष्का अशोक जाधव (१० सर्व रा. मुंंबई), मुस्कान आमिन पटेल (१२), मोहमद हसन पटेल (६ दोघेही रा. मुंबई), विजय राघवण (१८ तमिळनाडू), मोहन व्यंकट वाघमारे (४७), मिना मोहन वाघमारे (३४), शुभम मोहन वाघमारे (१६), चैतन्य मोहन वाघमारे (१० सर्व रा.नळेगाव ता.चाकुर जि.लातूर), सलिम चांद सय्यद (२३ रा.कल्याण), पंकज अंबादास घोडके (४५ रा.चिंचोलीमाळी ता.केज) अशी जखमींची नावे आहेत.

Web Title: Bus accident in Beed, 9 killed