शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, शहरामध्ये बंदमुळे भाविकांचे हाल

By admin | Updated: June 6, 2017 01:44 IST

जेजुरीमध्ये व्यापाऱ्यांसह किरकोळ विक्रेते व शेतकऱ्यांनी किसान क्रांती मोर्चामध्ये सहभागी होत आज कडकडीत बंद पाळला.

जेजुरी : शेतकऱ्यांच्या संपाला आणि मागण्यांना पाठिंबा देत जेजुरीमध्ये व्यापाऱ्यांसह किरकोळ विक्रेते व शेतकऱ्यांनी किसान क्रांती मोर्चामध्ये सहभागी होत आज कडकडीत बंद पाळला. येथील मुख्य चौकात रास्ता रोको आणि मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करीत सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला. शहरातील सर्व दुकाने-उपहारगृहे बंद असल्यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मात्र हाल झाले.सोमवारी (दि. ५) पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये जेजुरीसह धालेवाडी, कोथळे, नाझरे, बेलसर, मावडी क.प., मावडी पिंपरी व आसपासच्या पंचक्रोशीतील गावांमध्येही बंद पाळण्यात आला. पुणे-पंढरपूर राज्यमार्गावरील शहरातील मुख्य शिवाजी चौकात किसान क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती माणिक झेंडे पाटील, सामाजिक कार्यकर्ते बापूराव भोर, सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुधाकर टेकवडे, संचालक शांताराम कापरे, जेजुरीचे नगरसेवक सचिन सोनवणे, अजिंक्य देशमुख, शेकापचे तालुकाध्यक्ष संदीप जगताप, मराठा सेवा संघाचे ज्ञानोबा जाधव, शिवराम जगताप, महादेव शेंडकर, मुरलीधर काळाने, संतोष नाझीरकर, सुरेश उबाळे, मामा गरुड, शिवसेना शहरप्रमुख किरण दावलकर, महेश स्वामी, व्यावसायिक पंडित हरपळे, नंदू निरगुडे आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनाबरोबरच मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करीत सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा. शेतमालाला हमीभाव मिळावा आदी मागण्या करीत घोषणा देत शहरातून फेरी काढण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत देव, गणेश पिंगुवाले आदींसह कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नीरेत रोखला पालखी मार्ग नीरा : नीरा शहरातील व्यापारी व व्यावसायिकांनी आपली दुकाने व आस्थापने बंद ठेवून पाठिंबा दिला. त्याचबरोबर पुणे-पंढरपूर हा पालखी मार्ग काही काळ अडवून रास्ता रोकोही करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर मार्गदर्शन सभा घेण्यात आली. या वेळी शेतकऱ्यांनी आपली बाजू व्यापारी व व्यावसायिकांना सांगितली. तसेच या आंदोलनात शेतकरी व इतरांनीही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर पुणे-पंढरपूर या पालखी मार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको केला. मागण्यांचे निवेदन तलाठी संजय खोमणे व नीरा औट पोस्टचे सहायक फौजदार बाळासाहेब बनकर यांच्याकडे देण्यात आले. या वेळी भाजपा वगळता पंचक्रोशीतील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. खळद : सासवड-जेजुरी रोडवर तसेच रोडलगतच्या गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खळद येथे आजपासून सुरू होणारी सेंट जोसेफ शाळाही आज बंद ठेवण्यात आली. सर्व हॉटेल बंदमुळे प्रवाशांचे हाल झाले.मुला-मुलीचे शिक्षण मोफत, संपूर्ण वीज बिल माफ शेतीला पीक कर्ज 0% व्याज, मध्यम मुदत कजार्ला ३% व्याज, मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यत संप चालूच राहील. या वेळी सयाजी ताकवणे, संभाजी ताकवणे, राजाराम बोत्रे, अण्णासाहेब ताकवणे, विश्वास ताकवणे, रामचंद्र टिळेकर गुरुजी यांची भाषणे झाली. शेतकरी संपास हजारो शेतकरी उपस्थित होते. रेणुका सह दूध संस्थेच्या सभासदांनी रस्त्यावर दूध ओतून भाजप सरकारचा निषेध केला संप ७-६-२०१७ पर्यत चालू ठेवण्याचा निर्धार केला.