जुन्या वैमनस्यातून इसमाला जाळले
By Admin | Updated: June 16, 2014 01:08 IST2014-06-15T23:15:26+5:302014-06-16T01:08:07+5:30
अकोला शहरातील रोशनी वाढवे हिच्या आत्महत्येस जबाबदार असणारा कुख्यात गुन्हेगार चंद्या याच्या नातेवाइकांनी रोशनीच्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

जुन्या वैमनस्यातून इसमाला जाळले
अकोला : जुने शहरातील भगीरथवाडीतील रोशनी वाढवे हिच्या आत्महत्येस जबाबदार असणारा कुख्यात गुन्हेगार चंद्या ऊर्फ चंद्रकांत बोरकर याच्या नातेवाइकांनी रोशनीच्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात रोशनीचे वडील २८ टक्के भाजल्याने त्यांना तातडीने सवार्ेपवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास घडली.
३१ डिसेंबर २0१२ रोजी भगीरथवाडीमध्ये राहणारी युवती रोशनी वाढवे हिने घराजवळच राहणारा कुख्यात गुन्हेगार चंद्या ऊर्फ चंद्रकांत बोरकर याच्या छेडखानीला कंटाळून आत्महत्या केली होती. जुने शहर पोलिसांनी चंद्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. काही महिने चंद्या कारागृहातून जामिनावर बाहेर आला. एवढेच नाही तर पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएची कारवाई करून त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्धसुद्धा केले होते. तेव्हा बोरकर व वाढवे कुटुंबीयांमध्ये वैमनस्य वाढले होते. अधूनमधून या दोन्ही कुटुंबामध्ये वादाच्या ठिणग्यासुद्धा पडत; परंतु जुने शहर पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शनिवारी रात्री चंद्या बोरकर याच्या कुटुंबातील लोकांसोबत स्व. रोशनीचे वडील रमेश सीताराम वाढवे यांचा वाद झाला. या वादातून नाना बोरकर, महादेव बोरकर, प्रमोद बोरकर, सोनू बोरकर आणि सचिन बोरकर यांनी मिळून रमेश वाढवे यांच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि त्यांना पेटून देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात रमेश वाढवे हे २८ टक्के भाजले. त्यांना तातडीने सवार्ेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयातील जळीत कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिस शिपाई चिंचोळकर यांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम १४३, ३0७ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी फरार झाले आहेत.
** वाढवे कुटुंबीयावर लूटमारीचा गुन्हा
रमेश वाढवे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या घटनेनंतर चंद्या ऊर्फ चंद्रकांत बोरकर याने वाढवे कुटुंबीयांनी त्याच्या कुटुंबातील लोकांसोबत वाद घातला आणि त्यांच्याकडील पैसे व मोबाईल लुटून नेल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही त्याच्या तक्रारीनुसार पंकज वाढवे, विजू वाढवे, नितीन वाढवे, सुनील वाढवे यांच्यावर भादंवि कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल केला.