प्रेयसीच्या घरासमोर पेटवून घेतले

By Admin | Updated: October 27, 2014 02:28 IST2014-10-27T02:28:22+5:302014-10-27T02:28:22+5:30

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत सदस्याने मद्यधुंद अवस्थेत प्रेयसीच्या घरासमोर स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली़

Burned up at the house of the bridegroom | प्रेयसीच्या घरासमोर पेटवून घेतले

प्रेयसीच्या घरासमोर पेटवून घेतले

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत सदस्याने मद्यधुंद अवस्थेत प्रेयसीच्या घरासमोर स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली़
घोटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन महिन्यांपूर्वी झालेल्या धामणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तुकाराम रामजी गंभीरे (३५, रा़ गंभीरवाडी, पो़ धामणगाव) हे सदस्यपदी निवडून आले होते़
पूर्वी भिवंडी येथे सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या तुकाराम गंभीरेचे
एका विवाहित महिलेसोबत
प्रेमसंबंध होते, तसेच ती सोबत राहतही होती़
या दोघांच्या प्रेमाबाबत दोघांच्या कुटुंबीयांना माहिती होती़ ग्रामपंचायत सदस्य तुकाराम गंभीरेचा १५ वर्षांपूर्वीच विवाह झालेला असून, त्यांना दीड वर्षाची मुलगीही आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Burned up at the house of the bridegroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.