शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

राज्यभरात उत्साहात साजरा केला जातोय बैलपोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 15:26 IST

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.  राज्यभरात सर्वत्र उत्साहात बैलपोळा साजरा केला जात आहे.

कल्याण/जळगाव/वाशिम, दि. 21 -  बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.  राज्यभरात सर्वत्र उत्साहात बैलपोळा साजरा केला जात आहे.सोशल मीडियामध्ये गुरफटलेल्या तरुणांना भारतीय सणांची ओळख व  परंपरा समजावी व ही परंपरा कायम टिकावी यासाठी कल्याणमधील सम्राट अशोक विद्यालय विविध उपक्रम घेत असून यंदाही बैलपोळा सण मोठ्या उत्साहात शाळेत विद्यार्थ्यांनी साजरा केला. 

'माझा आवडता सण', असा निबंध शहरी भागातील विद्यार्थ्यांना केवळ काल्पनिकरित्या शाळेत लिहावा लागतो. परंतु बैलपोळा सण व त्याचे महत्त्व याबाबत अनेक विद्यार्थ्यांना माहिती नसते. यामुळे बैलपोळा सणाची माहिती विद्यार्थ्यांना समजावी, यासाठी ही शाळा मागील दोन वर्षांपासून शाळा परिसरात शेतकरी दादाला बोलावून प्रत्यक्ष सण साजरा करण्याची कल्पना शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांना सुचली व त्यांनी ती अमलातही आणली.  यंदादेखील त्यांनी तालुक्यातील मुकुंद पावशे व सरिता पावशे या शेतकरी दाम्पत्याला त्यांच्या बैलजोडीसह बोलावून बैलपोळा साजरा केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी टी धनविजय, सुजाता नलावडे  हे देखील उपस्थित होते.  शाळेच्या पटांगणात बैलांना सजवण्यात आले व बैलांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून हा सण उत्साहात साजरा केला.

शेतक-यांनी केली बैलांची सजावट शिरपूर (वाशिम)मध्येही पोळा सणानिमित्त शेतक-यांनी बैलांना सजवलं. त्यांची सजावट करण्यापूर्वी विविध तलावांमध्ये बैलांना आंघोळ घालण्यात आली.  दुपारी ३ वाजेपर्यंत पोहाडणे, बैलांची सजावट केली जाते. त्यानंतर बैल पोळ्यात आणले जातात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या या वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. 

जळगावात शेतात राबणा-या बैलांचा झाला सन्मानजळगावातील शिरसोली येथेदेखील बळीराजासोबत शेतात राबणा-या बैलांचा सन्मान म्हणून सोमवारी सर्वत्र पोळा उत्साहात साजरा झाला. बळीराजाने पोळा सणानिमित्त बैलांची सजावट केली. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी गाव परिसरातील तलावामध्ये बैलांना आंघोळ घातली. दुपारी 2 वाजेच्या सुमारास गावात आणून बैलांची सजावट केली जाते. त्यानंतर बैल पोळ्यात आणले जातात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या या वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. त्यानंतर कुटुंबातील महिलेकडून बैलाचे पूजन करीत पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. आपल्या घरातील धान्य बैलांना खाऊ घालत बळीराजाकडून बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.