शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जबरदस्तीने जमीन घ्यायला ही मोगलाई आहे का?; बुलेट ट्रेन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 11:22 PM

बुलेट ट्रेन सुनावणी उधळली; शेतकरी संतप्त

- हितेन नाईक पालघर : बुलेट ट्रेनसाठी लागणारी जमीन संपादन करण्यासाठी संबंधित गावात ग्रामसभा लावायची आणि दुसरीकडे बाधित शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता जनसुनावणी आयोजित करायची, ही प्रशासनाला हाताशी धरून शासनाने चालवलेली खेळी बुधवारी आदिवासी एकता परिषद आणि स्थानिक शेतकºयांनी एकत्र येत उधळून लावली.मुंबई- हमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्पाची (बुलेट ट्रेन) जनसुनावणी बुधवारी पालघर येथील पंचायत समितीच्या सभागृहात जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बुलेट ट्रेनसाठी पालघर जिल्ह्यातील १८७ हेक्टर जमिन संपादित करायची असून त्यापैकी अवघ्या ५.९ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात महसूल विभागाला यश आले आहे. बुलेट ट्रेनचा प्रस्तावित मार्ग हा वसई तालुक्यासह सफाळे, केळवे, पालघर, बोईसर, डहाणू भागातील ७१ गावांमधून जात असून ४२ गावातील भूसंपादन करण्यासाठी २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार अधिसूचना काढण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांनी लोकमतला सांगितले.वसई तालुक्यात मंगळवारी झालेली जनसुनावणी सामाजिक संस्थांनी उधळून लावल्यानंतर पालघर पंचायत समिती सभागृहात बुधवारी (२० नोव्हेंबर) उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आलेली जनसुनावणी आदिवासी एकता परिषद, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि ग्रामस्थांनी उधळून लावली. आम्हाला आमच्या जमिनी बुलेट ट्रेनसाठी द्यायच्याच नाहीत. आणि तसे ठराव आमच्या ग्रामसभेने शासनाला कळवले असूनही जबरदस्तीने जमीन संपादन करण्याचा प्रयत्न म्हणजे मोगलाई लागून राहिली आहे का? असा संतप्त सवाल उपस्थितांनी व्यक्त केला. वृत्तपत्रात जनसुनावणीची जाहिरात प्रसिद्ध करायची आणि दुसऱ्या बाजूला सर्वेक्षण करण्याच्या भागात ग्रामसभा लावायची असा डाव केंद्र शासन प्रशासनावर दबाव टाकून आखत असल्याचा आरोपही आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळू राम धोदडे यांनी केला. आम्ही या बुलेट ट्रेन विरोधात ३ वर्षांपासून लढा देत असून जमिनीचे सर्वेक्षण करू दिले जात नसल्याने चोरून, छुप्या पद्धतीने सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामसभेची मान्यता नसताना, विरोधात ठराव दिला जात असताना सरकारच्या डोक्यात हा लोकशाही मार्गाने सुरू असलेला विरोध शिरत कसा नाही? असा सवालही त्यांनी केला. शेतकºयाच्या हितापेक्षा भांडवलदारांचे हित जपणारे हे सरकार असून बाधितांना पुनर्वसनाच्या नावाखाली जिल्ह्याबाहेर फेकण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका धोदडे यांनी केली.जनसुनावणी हा नुसता फार्स असून हे शासनाने जिल्ह्यातील जमिनीवर ग्रीन झोनचे आरक्षण टाकून प्रथम इथल्या स्थानिकांना अडचणीत टाकले आहे तर दुसरीकडे ज्या जमिनीला ५ लाख प्रति गुंठे असा दर मिळतो त्या जमिनीला प्रति गुंठा ५० हजारचा दर जाहीर करून आमची लूट करीत असल्याचा आरोप शिवशक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा बाधित शेतकरी संजय पाटील यांनी केला आहे. लोकांनी घाम गाळून बनविलेल्या ५ ते १० लाख रुपये किमतीच्या घरांना मोबदला म्हणून फक्त सव्वा लाख रु पयांची भरपाई अन्यायकारक असल्याचेही पाटील यांनी सांगितले.या बुलेट ट्रेन प्रोजेक्टमुळे मच्छीमारही बाधित होणार असून बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, मुंबई-वडोदरा महामार्ग आदी प्रकल्प लादून स्थानिकांना उद्ध्वस्त करण्याचा डाव आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही.- पूर्णिमा मेहेर, राष्ट्रीय नेत्या, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन