शेलूबाजार चौकात वळूची तिसऱ्यांदा झुंज
By Admin | Updated: July 21, 2016 17:21 IST2016-07-21T17:21:19+5:302016-07-21T17:21:19+5:30
सकाळी पासुन तर संध्याकाळ पर्यंत नागरिकांच्या वर्दळीने गजबज राहण्याऱ्या शेलूबाजार येथील चौकात मागील आठवडा भरापासून दोन वळूमध्ये जोरदार झुंज होत आहे.

शेलूबाजार चौकात वळूची तिसऱ्यांदा झुंज
ऑनलाइन लोकमत
वाशीम, दि. २१ : सकाळी पासुन तर संध्याकाळ पर्यंत नागरिकांच्या वर्दळीने गजबज राहण्याऱ्या शेलूबाजार येथील चौकात मागील आठवडा भरापासून दोन वळूमध्ये जोरदार झुंज होत आहे.या झुंज दरम्यान काही वाहनाचे तर चौकातील फळांची दुकानाचे नुकसान झाले तर पानपट्टी धारक वासुदेव छबिले स्वत:चा विचविण्याच्या प्रयत्नात नाल्यात पडल्याने त्यांचा एक हात फँक्चर झाला आहे. शेलूबाजार चौकात वारंवार होणाऱ्या वळूच्या झुंजीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.या दोन वळू पैकी एका वळूचा बंदोबस्त करावा अशी मागणी चौकातील लघू व्यावसाईक व नागरिकांनी केली आहे.
दि.२१ रोजी ४ वाजताचे दरम्यान दोन्ही वळू चौकात आल्यावर चौकात आपला हक्क दाखविण्यासाठी तिसऱ्यांदा झुंज सुरु झाली शेकडो युवक नागरिक झुंज पाण्यासाठी जमले झुंज सुरु असतांना दोन्ही वळू चौकात असलेल्या नाल्यात पडल्याने झुंज थांबेल असेल वाटत होते परंतु नाल्यात पडल्यावरही एका वळूचा दुसऱ्या वर हमला सुरुच होता. या दरम्यान काही युवकांनी एकाला हकलून लावले परंतु पुन्हा अशी जीवघेणी व नुकसान करणारी झुंज होवू नये म्हणुन संबधीतांनी एका वळूचा बंदोबस्त करावा अशी मागणी चौकातील लघू व्यावसाईक नागरिकांनी केली आहे.