पुण्यात मंगळवारपेठेत भीषण आग
By Admin | Updated: May 9, 2016 17:26 IST2016-05-09T15:34:59+5:302016-05-09T17:26:31+5:30
पुण्यात मंगळवार पेठेत भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. दहा घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यात मंगळवारपेठेत भीषण आग
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ९ - मंगळवार पेठेतील भिमनगर झोपडपट्टीमध्ये सोमवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये आतापर्यंत दहा ते बारा झोपड्या जळाल्या असून पाच गॅस सिलेंडर फुटल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशामक दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले असून पाण्याचा मारा करुन आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
वा-यामुळे आग पसरत चालली असून पत्र्याची घरे असल्यामुळे आग झपाट्याने वाढत आहे. झोपडपट्टीच्या एका बाजुला तारेचे कुंपण असून अरुंद गल्ली बोळांमुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवानांचे मदतकार्य सुरु आहे.
झोपडपट्टीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या नाल्यात अग्निशामक दलाच्या जवानांनी गाड्या उतरवून बचाव कार्य सुरु केले. नाल्यामध्ये तसेच वस्तीमधील स्वच्छतागृहाच्या छतावर नागरिक चढले आहे.