बुलडाण्य़ात कडकडीत बंद
By Admin | Updated: June 8, 2014 23:44 IST2014-06-08T23:43:35+5:302014-06-08T23:44:39+5:30
आरक्षणाच्या मुद्यावर आक्षेपार्ह लिखाण करून फेसबुकवर अपलोड केल्याच्या निषेधार्थ बुलडाणा शहरात अघोषित बंद

बुलडाण्य़ात कडकडीत बंद
बुलडाणा : आरक्षणाच्या मुद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून फेसबुकवर अपलोड केल्याच्या निषेधार्थ रविवारी बुलडाणा शहरात अघोषित बंद पाळण्यात आला. बंददरम्यान परिवहन महामंडळाच्या बसेसची तोडफोड केल्याच्या तीन घटना घडल्या. परिणामी दुपारी ४ वाजेपर्यंत एसटी महामंडळाच्या बसेसही बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली असून, राज्य परिवहन महामंडळाचेही मोठे नुकसान झाले.
फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराची माहिती बुलडाण्यात पोहोचताच, दलित वस्त्यांमधील ४00 ते ५00 नागरिकांचा जमाव शहर पोलीस ठाण्यावर धडकला. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जमावाने प्रचंड नारेबाजीही केली. त्यामुळे काही काळ पोलीस स्टेशनच्या आवारात तणावपूर्ण शांतता होती. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी लगेच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
काही ठिकाणी तोडफोडीच्या घटनाही घडल्या. अज्ञात आरोपींनी बाजार लाईनमधील एका दुकानाची तोडफोड केली. शनिवारी रात्री बसच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर रविवारी सकाळी आणखी दोन बसेसची तोडफोड करण्यात आली. खबरदारीचा म्हणून परिवहन महामंडळाने सकाळी ८ वाजतापासूनच बसेस बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावरच ताटकळत बसावे लागले होते. या अघोषित बंदचा परिणाम आठवडी बाजारावरही झाला आहे. काही तालुक्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लिपीक टंकलेखक पदाची भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेसाठी जाणार्या विद्यार्थ्यांसाठी पोलिसांनी काही फेसबुकवर आक्षेपार्ह मजकुर अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे; मात्र या युवकाच्या नावे असलेले फेसबुक अकाऊंट बनावट असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.