अखेर आजपासून बुलडाणा जिल्हा बँकेचे व्यवहार पूर्ववत!

By admin | Published: June 1, 2016 01:18 AM2016-06-01T01:18:20+5:302016-06-01T01:18:20+5:30

शासनाने केलेल्या २0७ कोटींच्या मदतीमुळे बँक पुर्वपदावर.

Buldhana district bank finally untangled! | अखेर आजपासून बुलडाणा जिल्हा बँकेचे व्यवहार पूर्ववत!

अखेर आजपासून बुलडाणा जिल्हा बँकेचे व्यवहार पूर्ववत!

Next

बुलडाणा : गेल्या चार वर्षांपासून बंद पडलेल्या बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेला शासनाने केलेल्या २0७ कोटींच्या मदतीमुळे या बँकेला १३ मे रोजी बँकिग परवाना प्राप्त झाला. त्यामुळे बँक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ जून रोजी जिल्हा सहकारी बँकेचे व्यवहार पूर्ववत सुरू होणार आहेत. नव्याने सुरू होणार्‍या या बँकेचे थकीत पीक कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना तीन दिवसांत तत्काळ कर्ज पुरवठा केला जाणार असून, ठेवींचा परतावा करण्यासाठीही प्राधान्यक्रम ठरविला आहे. जिल्हा बँकेचा दैनंदिन व्यवहाराचा कालावधी बदलण्यात आला आहे. १ जूनपासून जिल्हा बँक सकाळी १0 ते ६ या कालावधीत उघडी राहणार असून, बँकिंग कामकाजाचे सहा तास चालणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना याचा फायदा होईल. बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागेल, त्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जातील. या ठेवी परतीसाठी जिल्हाधिकार्‍यांनी प्राधान्यक्रमानुसार ठेवीदारांना ठेवी परत केल्या जातील, अशी योजना तयार केली आहे.

Web Title: Buldhana district bank finally untangled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.