कल्याणमध्ये फुग्यामध्ये गॅस भरताना स्फोट, १२ मुले जखमी
By Admin | Updated: December 24, 2015 16:10 IST2015-12-24T16:06:21+5:302015-12-24T16:10:29+5:30
कल्याणमधल्या आर्य गुरुकुल शाळेमध्ये गुरुवारी दुपारी गॅसचे फुगे भरताना सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत १२ लहान मुले जखमी झाली आहेत.

कल्याणमध्ये फुग्यामध्ये गॅस भरताना स्फोट, १२ मुले जखमी
ऑनलाईन लोकमत
कल्याण, दि. २४ - कल्याणमधल्या आर्य गुरुकुल शाळेमध्ये गुरुवारी दुपारी गॅसचे फुगे भरताना सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेमध्ये फुगेवाल्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत १२ लहान मुले जखमी झाली आहेत. त्यांना कल्याणच्या मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शाळेमध्ये क्रीडा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा फुगेवाला गॅसचे फुगे भरत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. जखमी झालेली सर्व मुले शिक्षू, बालवर्गातील आहेत.