बुलडाणा ११४.0 तर वध्र्यात ९६.६ मि.मी.पाऊस २४ तासात अतवृष्टीचा इशारा
By Admin | Updated: September 9, 2014 04:37 IST2014-09-09T04:37:57+5:302014-09-09T04:37:57+5:30
यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच गत २४ तासात विदर्भात दमदार पर्जन्यवृष्टी झाली असून, सरासरीच्या ७७४.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

बुलडाणा ११४.0 तर वध्र्यात ९६.६ मि.मी.पाऊस २४ तासात अतवृष्टीचा इशारा
अकोला: यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच गत २४ तासात विदर्भात दमदार पर्जन्यवृष्टी झाली असून, सरासरीच्या ७७४.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
अद्याप ९ टक्के पावसाची तूट असली तरी असाच पाऊस सुरू राहिल्यास ही तूट भरू न निघण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, बुलडाणा येथे सर्वाधिक ११४.0 तर वर्धा येथे ९६.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भात आतापर्यंत साधारणत: ८५३ मि.मी. पावसाची गरज होती. प्रत्यक्षात ७७४.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भात यंदा दोन महिने उशिरा पावसाला सुरू वात झाली. गत दोन दिवस चांगला पाऊस झाला असला तरी, पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात आणखी पावसाची गरज आहे.
दरम्यान, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३0 वाजता संपलेल्या २४ तासात विदर्भातील बुलडाणा जिल्हयात सर्वाधिक ११४.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
त्या खालोखाल वर्धा येथे ९६.६ मि.मी. पाऊस झाला आहे. चंद्रपूर येथे ७६.१ मि.मी. ब्रम्हपुरी ९२.0 मि.मी., अकोला ७५.५ मि.मी., वाशिम येथे ६0.२ मि.मी., अमरावती ५९.६ मि.मी., यवतमाळ २७.४ मि.मी., गोदिंया १६.२ मि.मी., तर नागपूर येथे ६५.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २४ तासात अतवृष्टीचा इशारा ■ विदर्भात कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने अनेक ठिकाणी चांगला तर अनेक ठिाकणी अतवृष्टी होण्याचा इशारा नागपूर हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.