गूंज आश्रमशाळेची इमारत कोसळली

By Admin | Updated: August 3, 2016 02:55 IST2016-08-03T02:55:07+5:302016-08-03T02:55:07+5:30

वाडा तालुक्यातील गुंज येथील शासकीय आश्रमशाळेची इमारत मुसळधार पावसामुळे आज सकाळी कोसळली.

The building of the echoed Ashram school collapsed | गूंज आश्रमशाळेची इमारत कोसळली

गूंज आश्रमशाळेची इमारत कोसळली


वाडा : वाडा तालुक्यातील गुंज येथील शासकीय आश्रमशाळेची इमारत मुसळधार पावसामुळे आज सकाळी कोसळली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. येथील विद्यार्थ्यांना पाली येथील शासकीय आश्रमशाळेत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या शाळेत ३१७ विद्यार्थी निवासी शिक्षण घेत होते. या इमारती ३५ ते ४० वर्षापूर्वी बांधल्या गेल्या असून त्या आता कमकुवत झाल्या आहेत. दोन वर्षापूर्वी एका आश्रमशाळेची अशीच इमारत कोसळून २ विद्यार्थी जखमी झाले होते. माहिती मिळताच वाड्याचे तहसीलदार संदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी आश्रमशाळेला भेट देऊन सुरक्षिततेच्या काळजी घेण्याच्या सूचना आश्रमशाळा प्रशासनाला केल्या. दरम्यान, येथील शेतकरी रविंद्र जाधव यांच्या घराचे पत्रे काल रात्री मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने उडाले असून त्यांना बेघर होण्याची वेळ आली आहे. या पावसात त्यांचे धान्य, कपडेलत्ते सर्व पावसात भिजून गेले आहे. (वार्ताहर)

Web Title: The building of the echoed Ashram school collapsed