दादरमध्ये इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना
By Admin | Updated: February 15, 2017 19:10 IST2017-02-15T19:10:45+5:302017-02-15T19:10:45+5:30
मुंबईतील दादर टीटी परिसरात आज संध्याकाळी पुनर्विकासाचे काम सुरू अकलेल्या इमारतीचा काही भाग कोसळून अपघात झाला आहे

दादरमध्ये इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - मुंबईतील दादर टीटी परिसरात आज संध्याकाळी पुनर्विकासाचे काम सुरू अकलेल्या इमारतीचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली आहे. अलकनंदा असे कोसळलेल्या इमारतीचा नाव असून, ती तीन मजल्यांची होती. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक कार अडकली असून, या कारमधील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे.