शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मुंबईत झवेरी बाजार येथे इमारतीचा भाग कोसळला, 7 मजुरांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 6:14 PM

मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या मालकीच्या जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील झवेरी बाजारातील छिपी चाळ येथील इमारत क्रमांक ५०-५२ मधील चौथ्या मजल्याचा फ्लोरिंग स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळल्याचा घटना शुक्रवारी सकाळी घडली.

मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या मालकीच्या जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील झवेरी बाजारातील छिपी चाळ येथील इमारत क्रमांक ५०-५२ मधील चौथ्या मजल्याचा फ्लोरिंग स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळल्याचा घटना शुक्रवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत डागडुजीचे काम करणारे ४ मजूर गाडले गेल्याची माहिती उशिरापर्यंत कळाली होती. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू होते. त्यामुळे इमारतीमधील भाडेकरूंनी घरांचा ताबा सोडला होता.पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर संबंधित म्हाडा कंत्राटदाराचे कामगार टेकू लावण्याचे काम करत होते. त्याचदरम्यान सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास चौथ्या मजल्याचा फ्लोरिंग स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत सर्वच कामगार थेट तळ मजल्यापर्यंत आलेल्या ढिगा-याखाली अडकले. यातील ८ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र प्रत्यक्षदर्शी तानाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार कामगारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचे मोबाईलही बंद येत आहेत. त्यामुळे संबंधित कामगार दुर्घटनेदरम्यान पळून गेले, की ढिगा-याखाली अडकले आहेत, याचा अधिक शोध तपास यंत्रणा घेत आहेत...........................या प्रश्नांचे उत्तर म्हाडा देणार का?म्हाडा प्रशासनाकडून या इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू होते. दरम्यान, इमारत धोकादायक नसल्याची माहिती स्थानिक नगरसेवक आकाश पुरोहित यांनी दिली आहे. जर इमारत धोकादायक नव्हती, तर साध्या डागडुजीच्या कामादरम्यान थेट फ्लोरिंग स्लॅब कसा कोसळला? हा प्रश्न निर्माण होतो. शिवाय या दुर्घटनेची जबाबदारी ठरवून कोणत्या अधिका-यांवर म्हाडा कारवाई करणार? असा सवालहीयावेळी उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई