नालासोपाऱ्यात बिल्डरची हत्या

By Admin | Updated: November 6, 2014 05:33 IST2014-11-06T05:33:27+5:302014-11-06T05:33:27+5:30

नालासोपारा पूर्व भागातील बांधकाम व्यावसायिक आणि गॅस एजन्सीचे मालक राजेश सिंग यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली.

Builder murderer in the cavity | नालासोपाऱ्यात बिल्डरची हत्या

नालासोपाऱ्यात बिल्डरची हत्या

वसई : नालासोपारा पूर्व भागातील बांधकाम व्यावसायिक आणि गॅस एजन्सीचे मालक राजेश सिंग यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. ही हत्या व्यावसायिक स्पर्धेतून झाली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश सिंग हे बुधवारी सकाळी साईनाथनगर येथील आपल्या कार्यालयातून पूजा करून बाहेर पडले. त्याच वेळी पाठीमागून बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Builder murderer in the cavity