सद्भावनेचे रस्ते तयार करा

By Admin | Updated: May 30, 2016 03:10 IST2016-05-30T03:10:43+5:302016-05-30T03:10:43+5:30

तुम्ही सद्भावनेचेही रस्ते तयार करा, अशा शब्दांत लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुभेच्छा दिल्या.

Build goodwill roads | सद्भावनेचे रस्ते तयार करा

सद्भावनेचे रस्ते तयार करा


नागपूर : देशभरात वेगाने रस्त्यांचे जाळे निर्माण करणाऱ्या आणि विकासाचा अखंड ध्यास घेतलेल्या तुमच्यासारख्या लोकनेत्याच्या माध्यमातून विकासाचा एक महामार्ग देशात तयार होत आहे. यासोबतच तुम्ही सद्भावनेचेही रस्ते तयार करा, अशा शब्दांत लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी खा. दर्डा यांनी रविवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गडकरी आणि दर्डा यांच्यात विदर्भ आणि नागपूरच्या विकासाबद्दल प्रदीर्घ चर्चा झाली. मिहानमध्ये होत असलेल्या गुंतवणुकीला अधिक वेग यावा
आणि येथे येत असलेल्या प्रकल्पांची प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी,
अशी अपेक्षाही खा. दर्डा यांनी व्यक्त केली.
या भेटीवेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गडकरींच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
>स्वतंत्र विदर्भ राज्य कराच
स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, अशी वैदर्भीय जनतेची इच्छा आहे. आपण लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी तसे आश्वासनही दिले आहे. तेव्हा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणीसुद्धा खा. दर्डा यांनी यावेळी गडकरींकडे केली.

Web Title: Build goodwill roads