शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

शंभर कोटींचा अर्थसंकल्प

By admin | Updated: February 28, 2017 01:59 IST

५३ लाख ९४ हजार ९५२ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प २०१७-१८ सोमवारी मंजूर करण्यात आला.

लोणावळा : नगर परिषदेचे १०० कोटी ६७ लाख ६४ हजार ४५२ रुपये जमा व १०० कोटी १३ लाख ६९ हजार ५०० रुपये खर्च दाखविणारा आणि ५३ लाख ९४ हजार ९५२ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प २०१७-१८ सोमवारी मंजूर करण्यात आला.तुंगार्ली येथील स्वा. सावरकर विद्यालयाच्या सभागृहात नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत साधकबाधक चर्चा करत व जवळपास १३ कोटी रुपयांची वाढ सुचवत एकमताने मंजूर करण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी सचिन पवार, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व सर्व नगरसेवक व अधिकारी वर्ग उपस्थित होते. हा अर्थसंकल्प बनविताना नेहमीप्रमाणे आकड्यांचा खेळ करत पन्नास टक्क्यांहून अधिक प्रमाणात फुगवटा दर्शविण्यात आला असल्याचे मागील काही वर्षाच्या जमा व खर्चावरून दिसून येत आहे. नगर परिषद दर वर्षी न आलेल्या विविध अनुदान व अंशदाने या हेडखालील उत्पन्न व कधीही खर्च न झालेल्या अनेक हेडखाली मोठ्या रकमा दर्शवत हा फुगवटा करत आहे. या वर्षी मात्र शासनाच्या विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात विकासनिधी मिळविण्यासाठी सर्व नगरसेवकांनी एकदिलाने काम करून शहरात रखडलेली विकासकामे मार्गी लावू, असा आशावाद नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी व्यक्त केला. नगर परिषदेने २०१७-१८चा अर्थसंकल्प बनविताना विविध कर व दरांच्या माध्यमातून १८ कोटी १६ लाख ३३ हजार रुपये, नगर परिषदेच्या विविध मालमत्तांपासून एक कोटी ७६ लाख ४० हजार रुपये, वृक्षकरातून २५ लाख, विविध ठेवी, वसुल्या व फी पोटी ९ कोटी ६० लाख ७५ हजार रुपये व विविध अनुदाने व अंशदानापोटी २५ कोटी ५६ लाख ३२ हजार रुपये अशी ५५ कोटी ८४ लाख ७२ हजार रुपये प्रारंभिक शिल्लकेसह जमा दाखविण्यात आली आहे. वास्तवात मात्र विविध अनुदाने व अंशदाने या हेडमधील काही हेड असे आहेत, की त्यांच्यापासून मागील काही वर्षात नगर परिषदेला एकही रुपया अनुदान आलेले नाही, तरीदेखील भविष्यात या हेडखाली अनुदान मिळेल या आशेपोटी काही कोटी रुपये जमा बाजूला दाखविण्यात आले आहेत. (वार्ताहर) >सार्वजनिक सुरक्षिततेसाठी ९० लाखखर्चाच्या बाजूला सामान्य प्रशासन व वसुली खर्च याकरिता ९ कोटी ४४ लाख ६० हजार रुपये, सार्वजनिक सुरक्षिततेकरिता ९० लाख ४० हजार, नागरिकांच्या आरोग्य व सोयीकरिता २२ कोटी ३८ लाख ३८ हजार रुपये, शिक्षण क्षेत्राची निगडित विविध कामांसाठी १ कोटी ९१ लाख ६ हजार तर अंशदाने व संकीर्णच्या विविध हेडवर ८ कोटी ९३ लाख ६५ हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.