शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हा अर्थसंकल्प म्हणजे संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा केलेला निर्धार : केशव उपाध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 14:28 IST

आज अर्थमंत्र्यांनी सादर केला देशाचा अर्थसंकल्प

ठळक मुद्देआज अर्थमंत्र्यांनी सादर केला देशाचा अर्थसंकल्पअर्थसंकल्प आश्वासक आणि नवी उमेद देणारा : केशव उपाध्ये

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. "जगातील सर्वच देश कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले असताना भारताने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा निर्धार या अर्थसंकल्पात केलेला दिसून येत आहे. मरगळलेल्या सर्वच क्षेत्रांना मदतीचा हात देत, बळ पंखांना दिले हे, घे भरारी आकाक्षांची असा विश्वासच आज अर्थसंकल्पाने सर्व भारतीयांना दिला आहे," अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोना संकट त्यातून ढासळलेली अर्थव्यवस्था, त्यातून निर्माण झालेले प्रश्न या पार्श्वभूमीवर आरोग्य, उद्योग आणि शेती, पायाभूत सोयीसुविधा या घटकांवर विशेष लक्ष देण्याची गरज लक्षात घेत अर्थसंकल्पात तरतुदी केल्या आहेत. त्यामुळे नव्या दशकाचा पहिला अर्थसंकल्प हा खूपच आश्वासक असून सर्वांनाच नवी उमेद देणारा आहे. पाच ट्रीलयन डॉलर अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठी केलेल्या १३ क्षेत्रांची निवड करत पाच वर्षात १ लाख ९ कोटी रूपये खर्च करण्याची तयारी, आरोग्य क्षेत्राच्या बजेटमध्ये घसघशीत वाढ २.३८ लाख कोटी रुपयांची तरतूद, शेतकऱ्यांना दीडपड उत्पादन खर्चाच्या हमीभाव देणे, उज्ज्वला योजनेचा विस्तार करत एक कोटी लाभार्थ्यांचा सहभाग,  रस्ते व रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी रोड प्लान २०३०, उद्योगांना उभारी देण्यासाठी तरतूद ,रोजगार निर्माणासाठी भरभक्कम पावले हे अधोरेखित करणारे निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले असल्याचंही उपाध्ये म्हणाले. "टेक्सटाईल पार्क्समुळे शेतकऱ्यांना मदत होईलच पण त्यामुळे रोजगारातही वाढ होईल. त्याशिवाय निर्यातीला देण्यात आलेल्या प्रोत्साहनामुळे आत्मनिर्भर भारत निर्माणाच्या दिशेने होणारी वाटचाल वेगाने होईल," असेही त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :BJPभाजपाbudget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनParliamentसंसद