शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

बीएसएनएल ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 02:51 IST

भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)या सरकारच्या कंपनीला निधी उपलब्ध करून देण्याऐवजी, खासगी दूरध्वनी व मोबाइल कंपन्यांना सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले

अलिबाग : देशातील खेड्यापाड्यात आणि दरीडोंगरात, केवळ नफा डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर जनसामान्य ग्राहकांना दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वी भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)या सरकारच्या कंपनीला निधी उपलब्ध करून देण्याऐवजी, खासगी दूरध्वनी व मोबाइल कंपन्यांना सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले. असे असले तरी बीएसएनएल कर्मचारी व अधिकारी उपलब्ध साधनसामग्रीतून आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याकरिता सिद्ध असल्याचे प्रतिपादन बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे रायगड जिल्हा सचिव पुरुषोत्तम गेडाम यांनी केले आहे.बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन रायगडच्या पाचव्या अधिवेशनाचे आयोजन शनिवारी येथील बीएसएनएल टेक्निकल बिल्डिंगमधील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ‘ग्राहकांचा बीएसएनएलवरील विश्वास आणि बीएसएनएल अधिकाऱ्यांची भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादात गेडाम बोलत होते. गेडाम म्हणाले की, हातपाय बांधून ठेवायचे आणि कुस्ती खेळायला सांगायचे, अशी अवस्था सरकारने बीएसएनएलची केली आहे. बीएसएनएसच्या उपलब्ध मूळ पायाभूत व्यवस्थेच्या आधाराने खासगी मोबाइल कंपन्या केवळ नफा डोळ्यासमोर ठेवून बीएसएनएलबरोबर स्पर्धा करीत आहेत. या खासगी कंपन्या हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून बाजारात उतरल्या आहेत. त्याच वेळी बीएसएनएलकरिता केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद करण्यात येत नाही, यातूनच सरकार कोणासाठी काम करते आहे हे दिसून येत आहे. बीएसएनएल मोबाइल टॉवर्स खासगी कंपन्यांना देण्याचा सरकारचा जो प्रस्ताव आहे त्यास आमचा सक्त विरोध राहाणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले.बीएसएनएल टेलिकॉम डिस्ट्रीक्ट मॅनेजर सी.व्ही.राव म्हणाले की, रायगड जिल्ह्यात होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या विशेषत: महामार्गांच्या कामांमुळे बीएसएनएलची ओएफसी केबल तुटण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यातील समस्यांचे स्वरूप राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळे असल्याने, येथील समस्या दूरकरण्याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक कष्ट घ्यावे लागतात. परंतु ग्राहकांना उत्तम विनाखंड सेवा देण्याकरिता अखेर आपल्यालाच काम करावे लागणार आहे. अशाही परिस्थितीत बीएसएनएल जिल्ह्यातील बँका, ग्रामीण क्षेत्र, रुग्णालये, ग्रामपंचायती यांना चांगली सेवा देण्यात यशस्वी होत असल्याचे त्यांनी अखेरीस नमूद केले. बीएसएनएल कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले विचार मांडले.यावेळी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल जोग, बीएसएनएल टेलिकॉम डिस्ट्रीक्ट मॅनेजर सी.व्ही.राव, बीएसएनएल कामगार संघटनेचे वरिष्ठ अधिकारी भालचंद्र माने, दीपक जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.