भाईजानच्या दादीला चाळीस हजारांचा गंडा
By Admin | Updated: March 2, 2017 02:21 IST2017-03-02T02:21:29+5:302017-03-02T02:21:29+5:30
सुनीता शिरोले यांना एटीएमधून पैसे काढताना एका अनोळखी इसमाने तब्बल ४० हजार रुपयांचा गंडा घातला.

भाईजानच्या दादीला चाळीस हजारांचा गंडा
मुंबई : बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री तसेच भाईजान या चित्रपटात दादीची भूमिका बजाविणाऱ्या सुनीता शिरोले यांना एटीएमधून पैसे काढताना एका अनोळखी इसमाने तब्बल ४० हजार रुपयांचा गंडा घातला. या घटनेमुळे सिनेक्षेत्रात एकच खळबळ उडाली. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात ही घटना घडली. ओशिवारा पोलिसांनी एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून अधिक तपास सुरु केला आहे.
शिरोले यांनी नुकताच बजरंनी भाईजानमध्ये अभिनेत्री करीना कपुरच्या आईचा रोल केला होता. तसेच त्यांनी गुन्हे मालिकांमध्येही भूमिका बजावली आहे. मंगळवारी त्या ओशिवारा परिसरातील एटीएममधून पैसे काढत होत्या. मात्र पैसे काढण्यात अडचण निर्माण होत असल्याने त्यांनी तेथे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाची मदत घेतली. तिने ८ हजार रुपये काढले. त्यानंतर ती निघून गेली. अशात ठगाने पुढे सलग आॅप्शनवर क्लीक करत तब्बल ४० हजार रुपये तिच्या खात्यातून काढले. त्यांना याबाबत समजताच त्यांनी तत्काळ ओशिवारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन ओशिवारा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.
बुधवारी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. त्या फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली जात आहे. त्यानुसार अधिक तपास सुरु असल्याची माहिती ओशिवारा पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)