आरटीओतील कामकाजात पारदर्शकता आणणार
By Admin | Updated: May 16, 2015 00:17 IST2015-05-16T00:17:13+5:302015-05-16T00:17:13+5:30
ड्रायव्हिंग लायसन्स मिळविताना होणारा विलंब, येणाऱ्या तक्रारी, लांबच लांब लागलेल्या रांगा, सुविधांचा अभाव, चेकपोस्टवर

आरटीओतील कामकाजात पारदर्शकता आणणार
मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्स मिळविताना होणारा विलंब, येणाऱ्या तक्रारी, लांबच लांब लागलेल्या रांगा, सुविधांचा अभाव, चेकपोस्टवर होणारे गैरप्रकार पाहता आरटीओतील कामकाजात सुसूत्रता आणण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी लोकमतला सांगितले. आरटीओतील कामकाजात पारदर्शकता आणण्याची हमीही सेठी यांनी दिली.
आरटीओत कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विविध कामांसाठी लागणाऱ्या लांब रांगा आणि विलंब यातून त्यांची सुटका कशी करता येईल, याचा विचार केला जाईल असे सेठी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आरटीओत आॅनलाईन लर्निंग व्यवस्थेत अनेक स्तरावर ई-गर्व्हनन्सचा वापर केला जात असून त्याची व्याप्ती अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून यात काही त्रुटी तर राहिल्या नाहीतना याची माहीतीही घेतली जाईल, असे सोनिया सेठी म्हणाल्या. सध्या पुण्यात कंप्युटर ड्रायव्हिंग ट्रेस्ट यंत्रणा असून राज्यभर अशी यंत्रणा उभारण्याचा आमचा विचार आहे. महत्वाची बाब म्हणजे सीमानाके तपासणी उभारण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. मात्र या नाक्यांवर होणारे गैरव्यवहार पाहता त्याविरोधात कठोर असे पाऊल उचलण्यात येईल, अशी ग्वाही सेठी यांनी दिली. दलालांना आरटीओत बंदी करणार का असे सेठी यांना विचारले असता, न्यायालयाचे काही आदेश असून त्यांच्या आदेशाप्रमाणे आणि कायद्यातील तरतुदीप्रमाणेच भूमिका घेतली जाईल, असे सांगितले.