शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणा अन्...; चंद्रशेखर बावनकुळेंचं शेतकऱ्यांना मोठं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 18:13 IST

"देवेंद्र फडणवीस सरकारने कधीही शेतकऱ्यांची वीज कापण्याचा विचार केला नव्हता. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आले आणि..."

मुंबई - ऊर्जा मंत्रालयाने महाराष्टातील शेतकऱ्यांचे पुढील ३ वर्ष वीज कनेक्शन कापू नये, अशी आमची मागणी होती. पण महाविकास आघाडीने लबाडी केली. पुढील तीन महिने वीज तोडणीची कारवाई थांबविण्याचा निर्णय घेतला. हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. वीज तोडणीच्या संकटातून कायमचे मुक्त व्हायचे असेल तर महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणावे लागेल, असे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणाले आहेत. 

विधान सभेत ऊर्जा मंत्र्यांनी वीज तोडणीच्या मोहिमेला तीन महिन्यांसाठी ब्रेक लावला. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस सरकारने कधीही शेतकऱ्यांची वीज कापण्याचा विचार केला नव्हता. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आले आणि दुर्दैवाने वीज कनेक्शन तोडणी मोहीम राबविण्यात आली. आमच्या काळात ४ हजार ७१५ कोटींच्या नफ्यात असलेल्या विद्युत निर्मिती कंपन्या आज अंतर्गत भ्रष्टाचारामुळे डबघाईस आल्या आहेत. हा तोटा गरीब शेतकऱ्यांच्या खिशातून वसूल करण्यात येतो आहे. खरे पाहता, शेतकऱ्यांकडून वसुली करण्याचा अधिकार महाविकास आघाडीला नाही. तरीही वीज तोडणीची मोहीम सुरू असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या बिलात मोठ्या प्रमाणावर चुका असून, हे लक्षात येताच गरीब शेतकऱ्यांची वीज तोडणी करायची नाही, असे ठरवल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. वीज भलतीकडेच वापरली जाते आणि त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना भरावा लागतो. एकप्रकारे हा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नका, ही मोहीम तीन महिने नाही तर कायमची थांबवा. विद्युत निर्मिती प्रकल्प नफ्यात आणायचे असल्यास अंतर्गत भष्टाचारास आळा घाला, असे आवाहन आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. राज्याच्या विकाससाठी शेतकऱ्याची भूमिका मोलाची ठरणार असल्याचे देखील ते म्हणाले. 

सरकार चावलविण्यासाठी मनगटात ताकद लागते -सरकार चावलविण्यासाठी मनगटात ताकद लागते. आजच्या सरकारमधील मंत्र्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे. विदर्भ - मराठवाडाच्या विकासासाठी काय करता येईल याचा महाविकास आघाडीने विचार करावा. फक्त खानापूर्ती म्हणून सरकार चालवत बसू नये. मंत्री आपल्या मतदार संघासाठीच काम करत असल्याचे जाणवत असून, अर्थसंकल्पात ९५ आमदारांच्याच मतदारसंघाचा फायदा दिसतो. उर्वरित आमदारांना वाऱ्यावर सोडले असून, मतदारसंघ निवडून घेतले असल्याचेही. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी